---Advertisement---

अनादी.. अनंत.. अफाट विराट! सलग दुसऱ्या सामन्यात झळकावले ‘विक्रमी’ शतक

---Advertisement---

आयपीएल 2023 मधील अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवरील झालेल्या या सामन्यात आरसीबीचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने दमदार शतक झळकावले. हे त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील सातवे शतक ठरले. यासह आयपीएल इतिहासात सात शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज बनला.

विजय मिळवून प्ले ऑफसाठी पात्र होण्याची संधी असताना आरसीबीला नाणेफेक नमवावी लागली. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर विराट व कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 7.1 षटकात 67 धावा काढल्या. प्लेसिस बाद झाल्यानंतर इतर फलंदाज अपयशी ठरले.

मात्र, विराटने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत संघाची नौका पार लावली. त्याने 60 चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. मागील सामन्यात देखील त्याने हैदराबाद विरुद्ध शतकी खेळी केली होती. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सातवे शतक ठरले. विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत 61 चेंडूवर 101 धावांची खेळी केली. यामध्ये 13 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.

आरसीबीच्या डावाचा विचार केल्यास कोहलीच्या शतकाव्यतिरिक्त प्लेसिसने 19 चेंडूत 28, ब्रेसवेलने 26 व अनुज रावतने नाबाद 23 धावांचे योगदान दिले. गुजरात संघासाठी राशिद खान याने सर्वाधिक दोन बळी मिळवले. आरसीबीला प्ले ऑफमध्ये जागा बनविण्यासाठी 197 धावांचा बचाव करावा लागेल.

(RCB Legend Virat Kohli Hits Consecutive Century In IPL 2023 Seventh In IPL Career)

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---