आयपीएल 2022 पूर्वी फाफ डू प्लेसिसची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. विराट कोहलीने (Virat kohli) कर्णधारपद सोडल्यानंतर फ्रँचायझीने आपल्या संघाचा नवा कर्णधार म्हणून एका परदेशी खेळाडूची निवड केली आहे. फाफ डू प्लेसिसला बेंगलोरने लिलावात ७ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
मागील वर्षी सर्वाधिक काळ आरसीबीचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर संघ एका उत्तम कर्णधाराच्या शोधात होता. विराटने शेवटपर्यंत आरसीबीकडून खेळायचे असे ठरवले आहे, परंतु तो आरसीबीचा कर्णधार असणार नाही. फाफ डू प्लेसिसने दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद भूषवले असून, त्याला कर्णधारपदाचा खूप अनुभव आहे. फाफ डू प्लेसिस आरसीबीला ट्रॉफी जिंकून देईल, अशी आशा आहे.
एबी डिविलियर्सबद्दल फाफ डू प्लेसिस म्हणाला की, “मी आणि एबी डिविलियर्स नेहमी हे बोलायचो की, मला आरसीबीमध्ये कसे सामील होता येईल. वेळ चांगली नाही. कारण, आम्ही आरसीबीसाठी एकत्र खेळू शकणार नाही. यापुढे बरेच काही आहे. माझे ध्येय हे असेल की, मी इतर खेळाडूंसोबत माझे चांगले संबंध राखू शकेल, मला संघातही तीच संस्कृती निर्माण करायची आहे.”
https://twitter.com/RCBTweets/status/1502603973848494087?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1502603973848494087%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.insidesport.in%2Fcricket-news%2Frcb-new-captain-ipl-2022-officially-royal-challengers-bangalore-appoint-faf-du-plessis-as-new-captain-80724%2F
आरसीबीच्या नव्या जर्सीचेही शनिवारी (१२ मार्च )अनावरण करण्यात आले आहे. विराट आणि डू प्लेसिसचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फ्रँचायझीने आरसीबीच्या चाहत्यांसाठी खास शोचेही आयोजन केले होते. आरसीबी संघाने बंगळुरूमधील म्युझियम क्रॉस रोड, चर्च स्ट्रीट येथे थेट कार्यक्रम आयोजित केला होता.
आयपीएलचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. हंगामापूर्वी सर्व संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. यावर्षीची आयपीएल पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. यावर्षी ८ नव्हे, तर १० संघ आयपीएल खेळताना दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
साजिद खानच्या रॉकेट थ्रोने ऑस्ट्रेलियन फलंदाजाला धाडलं तंबूत; तब्बल २७ वर्षांनंतर घडली ‘अशी’ घटना
‘मॅचविनिंग’ शतकानंतर स्मृतीने दिली ‘त्या’ गोष्टीची प्रांजळ कबुली