---Advertisement---

ड्रेसिंग रुममध्ये रोहित शर्माची मस्ती, डू प्लेसिसची करून दाखवली नक्कल, फोटो व्हायरल

On: शनिवार, मार्च 5, 2022 7:23 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (IND vs SL Test Series) यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. सामन्याचा पहिला दिवस भारतीय संघासाठी चांगला राहिला. रोहित शर्मासाठी कर्णधाराच्या रूपातील हा पहिला कसोटी सामना आहे. पहिल्या डावात रोहित अवघ्या २९ धावांवर बाद झाला, पण ड्रेसिंग रूममधील त्याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत रोहित शर्मा दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज फलंदाज फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याची नक्कल करताना दिसत आहे. डू प्लेसिसची नक्कल करताना रोहित कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे, जेव्हा भारताच्या डावातील ४३ वे षटक टाकले जात होते. रोहित त्यावेळी त्याच्याच नादात दिसत आहे आणि त्यावेळी विराट कोहली आणि हनुमा विहारी खेळपट्टीवर खेळत होते.

https://twitter.com/nikesh_mehra/status/1499900634954629125

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवली गेली आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ असा पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर विराटने राजीनामा दिला. तत्पूर्वी विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते, तर एकदिवसीय कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेतले गेले होते. रोहित आता क्रिकेटच्या तिन्ही प्रकरांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. तिन्ही संघाची जबाबदारी स्वीकारणार रोहित ३५ वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा केला आहे, जो सर करणे श्रीलंका संघासाठी खूप मोठे आव्हान ठरणार आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने ४३ षटकात ४ बाद १०८ धावा केल्या. भारताने पहिला डाव १२९.२ षटकात ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला आहे. भारताकडून रविंद्र जडेजाने १७५ धावांची खेळी केली, तर रिषभ पंतने ९६ धावांची खेळी केली.

महत्वाच्या बातम्या –

शेन वॉर्नची शेवटची २० मिनिटे, नेमकं काय घडलं होतं? वाचा संपूर्ण घटनाक्रम

ना धोनी, ना कपिल देव; दिग्गजांना मागे टाकत श्रीलंकेविरुद्ध दीडशतक ठोकणारा जडेजा बनला अव्वल नंबरी 

PAK vs AUS: पहिल्या कसोटीच्या खेळपट्टीचा फोटो पाहून युझर्सनी केली थेट रस्त्याशी तुलना, पाहा मीम्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---