नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग आर्थात आयपीएलच्या १५व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने चांगले प्रदर्शन केले. मात्र, काही मुख्य खेळाडूंच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे आरसीबीला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पराभव पत्कारावा लागला. मात्र, आरसीबीकडे एक खेळाडू असा होता ज्याला खेळण्याची संधी मिळाली असती तर तो विशेष कामगिरी करू शकला असता. तो खेळाडू आहे इंग्लंड संघाचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू डेविड विले.
आयपीएलमध्ये आरसीबी (Royal Challangers Banglore) संघात समाविष्ट असलेला डेविड विले (David Willey) सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी२० ब्लास्ट स्पर्धेत विशेष कामगिरी करत आहे. डेव्हिड विली या स्पर्धेमध्ये यॉर्कशायर संघाकडून खेळत आहे. शुक्रवारी डरहम (Durhum) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात यॉर्कशायरने (Yorkshire) ६ विकेट्सने विजय मिळवला, ज्याचा सर्वात मोठा हिरो डेव्हिड विले होता. विलेच्या आक्रमक फलंदाजीमुळेच यॉर्कशायरला विजय मिळवता आला.
टी२० ब्लास्टमध्ये यॉर्कशायरकडून स्फोटक फलंदाजी करताना डेव्हिड विलीने २९ चेंडूत ७५ धावा केल्या. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही १९२.३१ होता. त्याच्या आक्रमक खेळीमुळे यॉर्कशायरला अवघ्या १८व्या षटकात विजयाची नोंद करण्यात यश आले.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना डरहमने २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य गाठणे सोपे नव्हते पण डेव्हिड विलीच्या स्फोटक फलंदाजीमुळे हे अशक्य काम शक्य झाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना यॉर्कशायरला सलामीवीर ऍडम लेथ आणि फिन ऍलन यांनी चांगली सुरुवात करून दिली कारण या जोडीने पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. फिन ऍलन बाद झाल्यानंतर ऍडम लिथने १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची धडाकेबाज खेळी केली. यानंतर डेव्हिड विलीनेही आपल्या फलंदाजीत चमक दाखवली.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दीपक चाहरच्या रिशेप्शन फोटोत पंतच्या शेजारी उभा राहिला पाकिस्तानी खेळाडू? जाणून घ्या सत्य
टी२० विश्वचषकात कोणता खेळाडू घेईल धोनीची जागा, शास्त्रींनी घेतले ‘या’ खेळाडूचे नाव
दक्षिण आफ्रिकेला हरवत भारत रचणार मोठा विक्रम, पाकिस्तानपेक्षाही ठरणार वरचढ