भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर काही दिवसांपूर्वीत लग्नबंधनात अडकला. त्याने १ जून रोजी त्याची प्रेयसी जया भारद्वाजशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. त्यावरून त्यांचे लग्न एकदम जंगी झाल्याचे दिसून येते. तसेच दीपक-जयाने लग्नानिमित्त मोठे रिशेप्शननही दिले. यावेळी अनेक आजी-माजी क्रिकेटपटू, तसेच क्रिकेटशी जोडलेले अनेक मान्यवर उपस्थित होते, पण यादरम्यानचा एक फोटो खूप व्हायरल झाला आणि त्याची चर्चाही झाली.
दीपक-जयाच्या (Deepak Chahar – Jaya Bhardwaj) रिशेप्शनवेळी भारताचे काही खेळाडूंनी एक फोटो काढला, ज्यात एक अनोखळी व्यक्ती दिसत आहे, ज्यावरून बरीच चर्चा रंगली. अनेकांचे म्हणणे आहे की, तो अनोखळी व्यक्ती हसन अली (Hasan Ali) आहे, तर अनेकांनी तो खलील अहमद असल्याचे म्हटले आहे. तो व्यक्ती हिरव्या रंगाचा कुर्ता घालून रिषभ पंतच्या (Rishabh Pant) शेजारी उभा आहे. या फोटोमध्ये रिषभ पंतव्यतिरिक्त रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, इशान किशन, शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा, दिशांक याग्निक देखील दिसत आहेत.
या अनोखळी व्यक्तीवरून बरीच चर्चा झाली असली, तरी हा व्यक्ती कोणी पाकिस्तानी खेळाडू (Pakistani Cricketer) किंवा खलील अहमद नसून मधूर खत्री आहे. मधूर खत्री देखील क्रिकेटपटू असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानकडून खळतो. तसेच तो दीपक चाहरचा चांगला मित्र देखील आहे. दरम्यान, दीपकच्या रिशेप्शनसाठी पियूष चावला, भुवनेश्वर कुमार, रॉबिन उथप्पा, सुरेश रैना देखील सामील झाले होते.
दीपकने आयपीएलदरम्यान घातलेली जयाला मागणी
चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल खेळणाऱ्या दीपक चाहरने आयपीएल २०२१ हंगामादरम्यान संघाच्या अखेरच्या साखळी सामन्यानंतर जयाला लग्नासाठी मागणी घातली होती. यावेळी तो सामना संपल्यानंतर स्टँडमध्ये बसलेल्या जयाकडे गेला होता आणि तिला भरलेल्या स्टेडियममध्ये अंगठी घातली होती. या घटनेचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.
दीपक सध्या दुखापतीचा सामना करत असून आयपीएल २०२२ मध्येही खेळला नाही. तसेच त्याला आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेलाही मुकावे लागणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
बेन स्टोक्सने चोळले किवींच्या जखमेवर मीठ, वर्ल्डकपची आठवण जागवणारा व्हिडेओ पाहाच
दक्षिण आफ्रिकेला हरवत भारत रचणार मोठा विक्रम, पाकिस्तानपेक्षाही ठरणार वरचढ
सचिन कुकला मागे टाकत रुटने रचलाय इतिहास, असं करणारा जगातील पहिला खेळाडू