इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील अंतिम सामन्याला आता फक्त दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. अशात प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघ प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. सध्या सर्वत्र ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकण्यासाठी संभावित दावेदारीची चर्चाही रंगली आहे. मात्र, असे असले, तरी या हंगामात सर्वाधिक धावा देण्यात महागडा ठरलेला गोलंदाज कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊया…
मोहम्मद सिराज सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज
या यादीत अव्वलस्थानी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आहे. सिराजने आतापर्यंत या हंगामात १३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४५ षटके गोलंदाजी करताना फक्त ८ विकेट्स आपल्या नावावर करू शकला आहे. यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ही ३० धावा देत २ विकेट्स घेणे ही आहे. यादरम्यान त्याने ९.८२च्या खराब इकॉनॉमी रेटने ४४२ धावा दिल्या आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर शार्दुल ठाकूर विराजमान
सिराजनंतर आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स संघाचा शार्दुल ठाकूर आहे. त्याने आतापर्यंत १२ सामने खेळताना ४१.२ षटकात ४०५ धावा दिल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट हा सिराजपेक्षाही जास्त आहे. त्याने ९.८०च्या इकॉनॉमी रेटने या धावा दिल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी ही ४० धावा देत ३ विकेट्स घेणे ही आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
टॉप- ५ गोलंदाजांमध्ये या गोलंदाजांचा समावेश
मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्याव्यतिरिक्त सर्वाधिक धावा देणाऱ्या आयपीएल २०२२मधील गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी कोलकाताचा प्रसिद्ध कृष्णा आहे. त्याने ३८५ धावा दिल्या आहेत. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन असून त्याने ३८४ धावा दिल्या आहेत. या यादीत पाचव्या स्थानी दिल्ली कॅपिटल्सच्या कुलदीप यादवचा समावेश आहे. त्याने ३७२ धावा दिल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आंद्रे रसेलचा हैदराबादविरुद्ध ‘अष्टपैलू’ खेळ, कोलकाताने ५४ धावांनी जिंकली रोमांचक लढत
मंकीगेट प्रकरणामुळे भारतीयांच्या डोक्यात गेला होता एँड्र्यू सायमंड्स, नक्की काय होतं ते प्रकरण?