वैशाक विजयकुमारनं (Vyshak Vijay Kumar) आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) चमकदार कामगिरी केली होती. तत्पूर्वी विजयकुमार आगामी महाराजा करंडक टी20 क्रिकेट स्पर्धेत केएससीए गुलबर्गा मिस्टिक्सचा उपकर्णधार आहे आणि तो आपल्या अनुभव आणि आत्मविश्वासानं या स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेपूर्वी त्यानं दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि मोहम्मद सिराजबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधील विराट कोहली (Virat Kohli) आणि मोहम्मद सिराजसारख्या (Mohammed Siraj) सिनीयर खेळाडूंकडून विजयकुमारला खूप काही शिकायला मिळाले असेल. तो म्हणाला, “विराट कोहलीसोबतचा सराव तुमच्यावर एक खेळाडू म्हणून खूप मोठा प्रभाव टाकू शकतो, मी त्याच्या खेळाची शैली आणि सातत्य याकडे लक्ष दिले, मग ते खाण्याच्या सवयी असो किंवा सराव, कोहली सर्व काही न चुकता करतो.”
विजयकुमार म्हणाला, “कोहली प्रत्येक सामन्यापूर्वी किती आत्मविश्वास बाळगतो हे शिकण्याजोगं आहे, आता मी प्रत्येक वेळी मैदानात उतरल्यावर तोच आत्मविश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी आरसीबीसाठी माझ्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती, पण नंतर मी पुढच्या सामन्यात 60 धावा दिल्या, त्यादरम्यान सिराजनं मला सांगितले की हा एक खेळ आहे आणि हे सर्वोच्च स्तरावर आव्हान आहे.”
पुढे बोलताना विजयकुमार म्हणाला की, “मला कर्णधारपद आवडते, पण देवदत्तच्या अनुभवामुळे आणि भारतासाठी नुकतेच पदार्पण केल्यामुळे मी त्याला उपकर्णधार म्हणून पाठिंबा देण्यास उत्सुक आहे, गेल्या हंगामात आम्ही त्याची खूप आठवण काढली, त्यामुळे या वर्षासाठी मी आशावादी आहे.”
वैशाक विजयकुमारबद्दल (Vyshak Vijay Kumar) बोलायचं झालं, तर तो आयपीएलमध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग आहे. शेवटच्या आयपीएल हंगामात त्यानं आरसीबीसाठी 4 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 4 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 10.26 होता, तर गोलंदाजी सरासरी 35.50 होती.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी जिवलग आता कट्टर प्रतिस्पर्धी! रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार
आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्स या 4 खेळाडूंना ठेवणार कायम, परदेशी दिग्गजांचाही समावेश
वयाच्या 40 व्या वर्षी भारतीय विकेटकीपरची ‘घरवापसी’, देशांतर्गत हंगाम खेळण्यास तयार, निवृत्तीबाबतही केलं मोठं वक्तव्य!