---Advertisement---

पंजाब किंग्जच्या नव्या जर्सीची नेटकऱ्यांनी केली थट्टा; चहलही म्हणाला, ‘वेलकम टू आरसीबी बॉइज’

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 9:42 AM
---Advertisement---

सोमवार रोजी (१२ एप्रिल) मुंबई येथे पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा चौथा सामना अतिशय रोमांचक ठरला. धाकधूक वाढलेल्या या सामन्यात पंजाबने अखेर ४ धावांनी विजय मिळवला. परंतु सामन्यानंतर पंजाबच्या विजयापेक्षा जास्त त्यांच्या जर्सीची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. आयपीएलप्रेमींपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांनी त्यांच्या जर्सीवरुन प्रतिक्रिया दिल्या. यात उडी घेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फिरकीपटू युझवेंद्र चहल यानेही पंजाबच्या क्रिकेटपटूंची मजा घेतली आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर चहलने पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि ख्रिस गेल यांचा छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘राहुल आणि गेल तुमचे आमच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात स्वागत आहे.’

पंजाब संघ आयपीएल २०२१ च्या नव्या हंगामात नव्या अपेक्षांसह उतरला आहे. त्यामुळे त्यांनी संघाचे नाव, लोगो आणि जर्सीदेखील बदलली आहे. त्यांची नवी जर्सी ही बेंगलोर संघाच्या जुन्या जर्सीशी मिळतीजुळती आहे. त्यांच्या जर्सीचा रंग ते डिझाईनपर्यंत बऱ्याच गोष्टी हुबेहुब आहेत. त्यामुळे चहलने राहुल आणि गेलसह संपूर्ण पंजाब संघाची टांग खेचली आहे.

https://twitter.com/yuzi_chahal/status/1381645050682077188?s=20

https://twitter.com/reversepaddle/status/1381609934446493698?s=20

https://twitter.com/twittingfan11/status/1381611304394358787?s=20

https://twitter.com/WisdenIndia/status/1381610996083531780?s=20

मजेची बाब अशी की, राहुल आणि गेल दोघेही बेंगलोर संघाचे सहकारी राहिले आहेत. गेलने २०११-१७ या कालावधीत बेंगलोरकडून ८५ सामने खेळले होते. तर राहुलने २०१३-१६ दरम्यान १९ सामन्यात बेंगलोरचे प्रतिनिधित्त्व केले आहे.

दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाल्यास, पंजाबकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार राहुलने सर्वाधिक ९१ धावा केल्या होत्या. ५० चेंडूत ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या गाठली होती. तर दिपक हुड्डाच्या ६४ धावा आणि ख्रिस गेलच्या ४० धावांच्या मदतीने पंजाबने २२१ धावांचा डोंगर उभारला होता.

प्रत्युत्तरात राजस्थानचा नवनियुक्त कर्णधार सॅमसनने एकाकी झुंज देत ११९ धावा कुटल्या होत्या. परंतु शेवटच्या चेंडूवर तो चौकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि पंजाबने ४ धावांनी सामना खिशात घातला.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या माजी मिस वर्ल्डची भविष्यवाणी ठरली खरी, केकेआरचा विजयासह झाला शुभारंभ

SRH च्या गोटात झोंबले ‘वाथी कमिंग’चे वारे; पाहा वॉर्नर, भुवी अन् राशिदचा झक्कास डान्स

मुंबईकर सूर्यकुमारच्या विस्फोटक फलंदाजीमागचं कारण काय? जाणून घ्या त्याचं ‘टॉप सिक्रेट’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---