आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळायला सुरुवात झाली असून राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर त्यांच्या यूएईमधील अभियानाची सुरुवात सोमवारी (२० सप्टेंबरला) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या दोन संघातील हा दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना असून हा सामन्यात दोन्ही संघात चांगलाच संघर्ष पाहायला मिळू शकतो.
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात आरसीबीने केकेआरविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला होता. आरसीबीमध्ये दिग्गज खेळाडूंची कमतरता नाही आणि त्यामुळेच संघ व्यवस्थापनासमोर सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडणे हे एकप्रकारचे आव्हानच आहे.
तरी, असा अंदाज वर्तवला जात आहे की केकेआरवीरुद्ध सामन्यामध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल हे दोघे फलंदाजीला सुरुवात करतील. पडिक्कलने या हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. तसेच रजत पाटिदारनेह पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केलेली आहे, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकतो.
क्रमांक चार आणि पाचसाठी आरसीबीकडे दोन दिग्गज खेळाडू आहेत. यामध्ये चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि पाचव्या क्रमांकावर दक्षिण अफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स फलंदाजीसाठी येऊ शकतो.
केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये आरसीबीची मधली फळी प्रभावशाली ठरू शकते. यामध्ये साहाव्या क्रमांकावर शाहबाज अहमद आणि त्यापाठोपाठ श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. हसरंगासाठी हा सामना आयपीएमधील पदार्पण सामना ठरेल.
काईल जेमीसन, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांचा संघात सामावेश असू शकतो. तसोच फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचाही संघात समावेश असेल. आरसीबीसाठी चहल आणि हसरंगा हे दोन फिरकी गोलंदाज सामन्यात काय कमाल करतील हे पाहण्यासारखे असणार आहे. आरसीबीला या दोघांकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. आरसीबी पहिल्या टप्प्यातील त्यांच्या प्रदर्शनानंतर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
केकेआरविरुद्ध सामन्यासाठी आरसीबीची संभावित प्लेइंग इलेव्हन : देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद , वानिंदू हसरंगा, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या –
सूर्यकुमारच्या ‘त्या’ कृत्याचे केले जातेय चाहत्यांकडून कौतुक
बॅटही तुटली अन् विकेटही गमावली, ट्रेंट बोल्टने ‘असे’ केले सुरेश रैनाला बाद; पाहा व्हिडिओ
पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे पहिले हिंदू ‘अनिल दलपत’