आयपीएलचा 11 वा मोसम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण त्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला एक धक्का बसला आहे. त्यांचा नॅथन कुल्टर नाईल हा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे या वर्षी आयपीएलला मुकणार आहे.
आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघात न्यूझीलंडचा अष्टपैलू कोरी अॅण्डरसन हा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर- नाईल ऐवजी खेळणार आहे. असे आयपीएलच्या तांत्रिक समितीने आज (मार्च 24) स्पष्ट केले.
गेल्या वर्षी कलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून कुल्टर- नाईलने 8 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी मात्र त्याला दुखापतीमुळे पुर्ण विश्रांती सांगितली आहे.
खेळाडू विनीमयानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला नोदंणीकृत खेळाडूऐवजी उपलब्ध असलेल्या जागी एक पर्याय निवडण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे बंगलोरने न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडू कोरी अॅण्डरसनला त्याच्या 2 कोटी या मूळकिमतीत संघात कुल्टर नाईल ऐवजी सामील करून घेतले, असे बीसीसीआयने सांगितले.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनेही या बातमीचे पुष्टीकरण करून निवेदन जारी केले,” नॅथन कुल्टर- नाईल अद्यापही दुखापतग्रस्त आहे आणि त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तो प्रचंड प्रतिभा आहे आणि त्याच्या उपचारांमुळे तो आयपीएलच्या हंगामात खेळू शकणार नाही. त्याची अनुपस्थिती संघात आणि मैदानावर जाणवेल.”
” बदली खेळाडू म्हणून संघात समाविष्ट केलेला अष्टपैलू खेळाडू कोरी अॅण्डरसन हा एक अतिशय धाडसी खेळ करणारा आणि अविश्वसनीय क्षमता असणारा खेळाडू आहे,” असे बंगलोरचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी म्हणाले.
अॅण्डरसन याआधी मुंबई इंडीयन्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाकडून खेळला आहे. त्यावेळी त्याने 27 सामन्यात 27.42 च्या सरासरीने 521 धावा काढल्या व आठ विकेट्स घेतल्या होत्या.
बंगलोरचा यावर्षी आयपीएलमधील पहीला सामना 8 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.
UPDATE – @coreyanderson78 to replace injured Nathan Coulter-Nile in @RCBTweets’s squad for #VIVOIPL 2018
More details here – https://t.co/9kDdSbdQV2 pic.twitter.com/GAoeTAGuzy
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2018