---Advertisement---

RCB vs DC: आरसीबीने दिल्ली कॅपिटल्स संघाला जिंकण्यासाठी दिलं 164 धावांचं आव्हान

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 24 वा सामना आज (10 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोन्ही संघांमध्ये खेळला जात आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, व बंगळुरूला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. आरसीबीने प्रथम फलंदाजी करून 163 धावा केल्या तसेच आता दिल्लीला जिंकण्यासाठी 164 धावांचं आव्हान दिलं आहे.

बंगळुरूसाठी प्रथम फलंदाजी करताना फील साल्टने 37 धावा केल्या. त्यादरम्यान त्याने 4 चौकार व 3 षटकार झळकावले. तसेच विराट कोहलीने 22 धावा केल्या. या धावांसह त्याने आयपीएल मध्ये 1000 बॉउंड्री पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. तसेच कर्णधार पाटीदार आज काही प्रभावी कामगिरी करू शकला नाही त्याने फक्त 25 धावा केल्या तसेच टीम डेविडने 37 धावा केल्या.

दिल्लीसाठी गोलंदाजी करताना विप्रज निगमने 2 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. दिल्लीने चांगली गोलंदाजी करत आरसीबीला फक्त 163 धावांवर रोखले. आता दिल्ली किती षटकात हे आव्हान पूर्ण करेल हे पाहणं रंजकतेचे असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---