आयपीएल 2023 चा अर्धा हंगाम उलटून गेला असून, स्पर्धेच्या उत्तरार्धात आणखी रंगतदार सामने होण्याची शक्यता आहे. अद्याप आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची कामगिरी आतापर्यंत संमिश्र झालीये. अशात संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली दुखापतग्रस्त होत हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून आरसीबीने भारताचा वरिष्ठ फलंदाज केदार जाधव याला संधी दिली. आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची घोषणा केली.
🔊 ANNOUNCEMENT 🔊
Indian all-rounder Kedar Jadhav replaces injured David Willey for the remainder of #IPL2023.
Welcome back to #ನಮ್ಮRCB, Kedar Jadhav! 🙌#PlayBold @JadhavKedar pic.twitter.com/RkhI9Tvpi1
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 1, 2023
या हंगामात आरसीबीसाठी चार सामने खेळलेल्या विली याला सरावा दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे आता तो यापुढे आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या जागी केदार जाधव संघाचा भाग केदार यावर्षी आयपीएल लिलावात विकला गेला नव्हता. केदारला या हंगामासाठी एक कोटी रुपये देण्यात येतील.
केदारने यावर्षी रणजी ट्रॉफी दरम्यान महाराष्ट्रासाठी पुनरागमन केले होते. मागील वर्षी तो कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नव्हता. केदारने आपले आयपीएल पदार्पण 2010 मध्ये दिल्ली डेअरडेविल्ससाठी केलेले. त्यानंतर कोची टस्कर्स केरला, आरसीबी, दिल्ली, चेन्नई सुपर किंग्स व सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठी त्याने आपले कौशल्य दाखवले. 2016 व 2017 अशी दोन वर्षे तो आरसीबीचा भाग राहिला आहे.
त्याच्या आयपीएल कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने आत्तापर्यंत 93 सामन्यांमध्ये 1196 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे सध्या केदार आयपीएल 2023 मध्ये मराठी समालोचन करत होता. मात्र, आता तो मैदानावर खेळताना दिसणार आहे.
(RCB Sign Kedar Jadhav For Remainder Of IPL 2023 As Replacement Of David Willey)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवांनी हलले राजस्थान-सीएसकेचे सिंहासन! मुंबईची मुसंडी मारण्यास सुरुवात, अशी आहे गुणतालिका
डेव्हिड-पोलार्डची तुलना होऊ लागल्यावर कॅप्टन रोहितचे मोठे वक्तव्य, म्हणाला “त्याच्याकडे क्षमता आहे. मात्र…”