संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू झालेल्या आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धातील दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) व कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आमने सामने आले. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा निर्णय उलटा पडला. केकेआरच्या गोलंदाजांनी त्यांचा पहिला डाव अवघ्या ९२ धावांवर गुंडाळला. यासह एका नकोशा यादीत आरसीबी संघ दुसऱ्या यादीत आला.
आरसीबीच्या फलंदाजांची हाराकिरी
प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर आरसीबीचा डाव सुरुवातीपासूनच घसरला. कर्णधार विराट कोहली दुसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर नियमित अंतराने संघाचे सर्व फलंदाज बाद झाले. आरसीबीसाठी देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक २२ धावा केल्या. केकेआरसाठी आंद्रे रसेल व वरून चक्रवर्ती यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले. विराटशिवाय एबी डिव्हिलियर्स व ग्लेन मॅक्सवेल हे देखील चमक दाखवू शकले नाहीत.
आरसीबीचा नकोसा विक्रम
या सामन्यात ९२ धावांवर सर्वबाद होताच आयपीएल इतिहासात सहाव्यांदा आरसीबी १०० पेक्षा कमी धावसंख्येत बाद झाला. विशेष म्हणजे या सहापैकी तीन वेळा ते केकेआरविरूद्धच १०० चा आकडा पार करू शकले नाहीत. २००८, २०१७ व २०२१ मध्ये केकेआर विरूध्द त्यांच्यावर ही नामुष्की आली. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा १०० पेक्षा कमी धावांवर बाद होणारा संघ दिल्ली कॅपिटल्स आहे. ते दहावेळा १०० पेक्षा कमी धावांमध्ये बाद झाले आहेत.
आरसीबीचा लाजीरवाणा पराभव
फलंदाजांनी लौकिकास साजेशी कामगिरी न केल्याने आरसीबीचा डाव ९२ धावांवर संपलेला. गोलंदाज काहीतरी चमत्कार करतील अशी अपेक्षा असताना, गोलंदाजांनी देखील आरसीबी चाहत्यांना निराश केले. शुबमन गिल व व्यंकटेश अय्यर यांनी पहिल्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी करत केकेआरचा विजय निश्चित केला. गिल ४८ धावा काढून चहलच्या चेंडूवर माघारी परतला. व्यंकटेश अय्यर ४१ धावा काढून नाबाद राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे!! ‘इतक्या’ कोटींना विकली जाणार विराट कोहलीची ‘सुपर कार’; किंमत वाचून व्हाल चकीत
विराटची बात काही औरच!! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू





