सध्या आयपीएल 2025चा हंगाम अगदी रोमांचक पद्धतीने सुरू आहे. दरम्यान प्रत्येक संघात कोणीतरी खेळाडू फिनिशरची भूमिका बजावत असतो. फिनिशर म्हणजे जेव्हा सामना अडकलेला असतो, तेव्हा तुमच्या बॅटच्या ताकदीने तो शेवटपर्यंत नेतो. तुमच्या संघाच्या विजयासाठी अशी खेळी खेळणे जी सामन्याचा मार्ग बदलू शकेल. असेच जितेश शर्मा (Jitesh Sharma) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) खेळतो. संघात त्याची ही भूमिका आहे.
फिनिशरला सामान्यतः कमी चेंडू खेळून जास्त प्रभाव पाडावा लागतो आणि अशा परिस्थितीत त्याच्या खेळीचे महत्त्व वाढते. जितेश शर्मा म्हणाला की, खालच्या फळीत फलंदाजी केल्याने आरसीबीसाठी त्याची खेळी महत्त्वाची बनली आहे. आता तो 30-40 धावांच्या डावालाही अर्धशतक मानतो.
आयपीएलच्या या हंगामात जितेश सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. इथे अनेकदा वेगवान खेळी खेळण्याची गरज असते. अलिकडेच त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 19 चेंडूत 40 धावा केल्या.
आरसीबी बोल्ड डायरीजच्या ताज्या भागात जितेश शर्मा म्हणाला, “आता प्रत्येकजण फिनिशर आहे. पण सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणे सोपे नाही कारण जेव्हापासून मी फिनिशरची भूमिका बजावत आहे, तेव्हापासून मी अर्धशतक झळकावलेले नाही. पूर्वी मी अर्धशतके आणि शतके करायचो.”
पुढे जितेश म्हणाला, “कोणतीही कामगिरी केल्यानंतर बॅट उचलणे चांगले वाटायचे. पण जेव्हापासून मी फिनिशर झालो, तेव्हापासून मी अर्धशतकही झळकावलेले नाही. 30 धावा, 20 चेंडू, 40 धावा. आता या धावसंख्याच अर्धशतकासारख्या आहेत. जर तुम्ही 30 चेंडूत 60 किंवा 70 धावा करत असाल तर ते शतकासारखे आहे. संघ जिंकत असेल तर मला आनंद आहे.”
जितेशने सांगितले की, यष्टीरक्षक असल्याने त्याला खेळपट्टी आणि विरोधी फलंदाजाला चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. “तुमचा मेंदू थकतो,” तो म्हणाला. याचा फायदा असा आहे की तुम्ही तिथून खेळ नियंत्रित करू शकता. तुमच्या संघाचे गोलंदाज या खेळपट्टीवर काय करू शकतात? हे तुम्हाला कळेल. तुम्ही दुसऱ्या संघाच्या फलंदाजांचा अंदाज लावू शकता.
जितेश शर्माच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यत 46 सामने खेळले आहेत. त्याने 23.37च्या सरासरीने 818 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 151.48 राहिला आहे. तर त्याची सर्वाच्च धावसंख्या नाबाद 49 आहे.






