विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ यंदा चांगल्याच फॉर्ममध्ये दिसून येत आहे. गेल्या १३ हंगामात जेतेपद मिळवण्यात अपयशी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या ३ सामन्यांमध्ये विजयाची हॅट्रिक केली आहे. आता पुढील सामन्यांसाठी हा संघ मुंबईत दाखल झाला आहे. अशातच युजवेंद्र चहलसोबत त्याची पत्नी धनश्री वर्मानेही मुंबईत हजेरी लावली आहे. तिने शेअर केलेली इंस्टाग्राम स्टोरी प्रचंड व्हायरल होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपले सुरुवातीचे सामने चेन्नईत खेळले होते. आता त्यांचे पुढील सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ मुंबईत दाखल झाला आहे.
https://www.instagram.com/p/CN2pdOfA_jF/?igshid=tt7qlnurpb2p
युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने विमानातून मुंबईचा फोटो क्लिक केला आहे. त्या फोटोवर तिने कॅप्शन म्हणून लिहिले आहे की, ‘मुंबई, महाराष्ट्र, खूप दिवसानंतर तिथे पोहोचली जिथे माझं हृदय आहे.’
तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे सदस्य श्रीकर भरत याने देखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दिसून येत आहेत. तसेच या फोटोमध्ये संघातील सदस्य सचिन बेबी आणि मोहम्मद अजहरुद्दीन देखील दिसून येत आहेत.
https://www.instagram.com/p/CN10ewqDLp3/?igshid=auv4zkhrtttt
यासोबतच कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि त्याची चिमुकली वामिका देखील मुंबई विमानतळावर दिसून आली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा पुढील सामना येत्या २२ एप्रिलला राजस्थान रॉयल्स संघासोबत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई टू मुंबई, आरसीबीचा कर्णधार कोहली पत्नी अन् लेकीसह मुंबईत दाखल; विमानतळावरील Video व्हायरल
गेल, कोहली किंवा धोनी नव्हे तर ‘हे’ आयपीएलचे सर्वात खतरनाक फलंदाज, फिरकीपटू कुलदीपने सांगितली नावं
चेन्नईच्या हातून राजस्थान चारीमुंड्या चित; कर्णधार संजू म्हणाला, “आम्हाला अपेक्षा नव्हती की…”