सोमवारी (११ ऑक्टोबर) कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात आयपीएलचा एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने शेवटच्या षटकात विजय मिळवला आणि आरसीबीला स्पर्धेतून बाहेर केले. यानंतर आरसीबीसाठी शेवटच्या षटकात गोलंदाजी करणारा डॅन ख्रिस्चियन आणि त्याची प्रेयसी यांना सोशल मीडियावर ट्रोल्सचा सामना करावा लागला. यानंतर आरसीबीचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलसह आरसीबीचा पूर्ण संघ त्याच्या समर्थनार्थ उतरला आहे. आरसीबीने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक ट्वीट केले आणि ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे.
आरसीबीने त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “डॅन ख्रिस्चियन, आम्ही १००% तुमच्या सोबत आहोत. आम्ही खेळाडू आणि विशेषत: त्यांचा परिवार आणि प्रियजनांच्या विरोधात होत असलेल्या ऑनलाइन दुर्व्यवहाराला खपवून घेणार नाही. जिंकणे आणि हरणे हा या सुंदर खेळाचा भाग आहे, ज्यावर आपण सर्वजन प्रेम करतो. आमचे खेळाडू त्या स्तरावर पोहोचण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात, ज्या स्तरावर ते आहेत. ते यासाठी त्यांचे सर्वकाही देण्याचा प्रयत्न करतात आणि आमच्यासाठी खेळ जिंकतात.”
आरसीबीने केकेल्या ट्वीटपूर्वी आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेनेही ट्रोलर्सविरोधान एक ट्वीट कले होते. तो ट्वीटमध्ये म्हटला होता की, “आरसीबीसाठी हा चांगला हंगाम राहिला. दुर्दैवाने आम्ही थोडे ढिले पडलो. काही लोक, जे सोशल मीडियावार घाण पसरवत आहेत, ते घृणास्पद आहे. आम्ही माणूस आहोत, जे प्रत्येक दिवशी आपले सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करतात. अपशब्द बोलण्यापेक्षा चांगले व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. खऱ्या चाहत्यांचे धन्यवाद, ज्यांनी खेळाडूंना प्रेम दिले आणि त्यांचे कौतुक केले. असे असले तरी, सोशल मीडियावर काही भितीदायक लोकही आहेत. हे पूर्णपणे अस्विकार्य आहे.”
We’re 100% with you @danchristian54 and we will not tolerate online abuse towards players and especially towards their families and loved ones. #PlayBold #WeAreChallengers #SayNoToOnlineAbuse pic.twitter.com/w2UvpyJ6aD
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) October 12, 2021
Winning and losing are a part of this beautiful game we all love. Our players put in the hard work day in and day out to reach the level they’re at. They give it their everything to try and win the game for us! #PlayBold #WeAreChallengers #SayNoToOnlineAbuse
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) October 12, 2021
दरम्यान, आरसीबीने एलिमिनेटर सामन्यात त्यांच्या गोलंदाजीवेळी शेवटचे षटक डॅन ख्रिस्चियनला दिले होते. केकेआरला या षटकात विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. ख्रिस्टियनच्या पहिल्याच चेंडूवर शाकिब अल हसनने चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली आणि इयॉन मॉर्गन स्ट्राइकवर आला. मॉर्गननेही षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि शेवटच्या तीन चेंडूत एक धावा आवश्यक असताना शाकिबने पुन्हा एक धाव घेतली आणि सामन्यात विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकातील सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडिया ‘या’ दोन बलाढ्य संघांशी करणार दोन हात
टी२० विश्वचषकासाठी जाण्यापूर्वी कमिन्सच्या घरी चिमुकल्याचे आगमन, क्यूट व्हिडिओसह दिली माहिती
थँक्यू विराट! तो कर्णधार नसला, तरी कायम लीडर राहील, हर्षल पटेलने गायले गुणगान