मुंबई। वानखेडे स्टेडियमवर शनिवारी (२१ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. हा सामना मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने जिंकला. मुंबईच्या या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सर्वात जास्त फायदा झाला. कारण, मुंबईने विजय मिळवताच रॉयल चॅलेजर्स बेंगलोर संघाचे प्लेऑफमधील स्थान पक्के झाले. त्यामुळे बेंगलोरच्या संघाने हॉटेलमध्ये जोरदार जल्लोष केला.
हा सामना दिल्ली (Delhi Capitals) आणि बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघासाठी निर्णयक ठरणार होता. दिल्लीने हा सामना जिंकला असता, तर ते प्लेऑफला (IPL 2022 Playoffs) पोहचणारा चौथा संघ ठरला असता. पण, मुंबईने हा सामना जिंकल्याने बेंगलोर प्लेऑफला पोहचले. बेंगलोरच्या आधी राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी यापूर्वीच प्लेऑफमधील जागा पक्की केली होती.
त्यामुळे बेंगलोर संघ शनिवारी मुंबईला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत होता. विशेष म्हणजे बेंगलोरच्या संपूर्ण संघाने मिळून शनिवारचा सामना पाहिला. तसेच मुंबईने सामना जिंकल्यानंतर बेंगलोरच्या संपूर्ण संघाने खूप सेलिब्रेशन केले. यावेळी बेंगलोरच्या अनेक खेळाडूंनी मुंबई इंडियन्सचे आभार मानले. तसेच प्लेऑफला पात्र ठरल्याबद्दल खेळाडूंनी एकमेकांची गळाभेट घेत एकमेकांचे अभिनंदन केले.
त्याचबरोबर बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) मुंबई इंडियन्सचे आभार मानताना, त्यांचा हा विजय अनेक वर्षांसाठी लक्षात राहिले असे म्हटले आहे. बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही (Faf du Plessis) आनंद व्यक्त केला. तसेच ग्लेन मॅक्सवेल म्हणाला की, बेंगलोर आता इतिहास रचण्यापासून थोडेच पाऊले दूर आहे. बेंगलोरच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ संघाच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर करण्यात आला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण सामन्यादरम्यान बेंगलोर संघाने कशाप्रकारे मुंबईला पाठिंबा दिला हे देखील दिसून येत आहे.
RCB qualified for the playoffs for the third consecutive year. We bring to you raw emotions, absolute joy and post-match celebrations, as the team watched #MIvDC. This is how much it meant to the boys last night.@kreditbee#PlayBold #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/5lCbEky8Xy
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 22, 2022
बेंगलोरने आयपीएलमध्ये सलग तिसऱ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांना २५ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध एलिमिनेटरचा सामना खेळायचा आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलचा १५ वा हंगाम मुंबईसाठी ठरला खूपच वेगळा, संघाबाबत पहिल्यांदाच घडल्या ‘या’ तीन गोष्टी
रोहित शर्माने प्लेऑफमध्ये पोहचलेल्या बेंगलोरला दिल्या शुभेच्छा, तर विराटचे ‘हे’ ट्वीट व्हायरल
IPL च्या १५ व्या हंगामाला मिळाले अंतिम ४ संघ, पाहा कसे आहे प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक