आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि त्यांचा कर्णधार रोहित शर्मा चालू हंगामात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. शनिवारी (२१ मे) दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सने धुळ चारली आणि प्लेऑफमधून देखील बाहेर केले. रोहित शर्माने चालू हंगामात एकही अर्धशतक केले नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तो अर्धशतक करेल अशी शक्यता होती, पण तसे होऊ शकले नाही.
मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२२ हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून केलाचा बाहेर झाला आहे. रोहित शर्मा संपूर्ण हंगामात अर्धशतक करू शकला नाही. पण या हंगामात तरी तो अर्धशतक करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, असे झाले नाही. रोहितने १३ चेंडू खेळले आणि अवघ्या २ धावा करून विकेट गमावली. सलामीवीराच्या भूमिकेत संपूर्ण हंगामात एकही अर्धशतक करू न शकलेला रोहित आयपीएलमधील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी निराशाजनक कामगिरी करणारा एकही सलामीवीर आयपीएलमध्ये पाहायला मिळाला नव्हता.
आयपीएलच्या चालू हंगामातील रोहितच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये त्याने २६८ धावा केल्या आहेत. हा त्याचा आजपर्यंतचा सर्वात खराब आयपीएल हंगाम ठरला आहे. रोहित शर्माने सर्वात जास्त निराशाजनक प्रदर्शन केलेल्या पाच आयपीएल हंगामांचा विचार केला, तर आयपीएल २०२२ या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आयपीएल २०१८ आहे. या हंगामात रोहितने २८६ धावा केल्या होत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आयपीएल २०२० हंगाम आहे, ज्यामध्ये रोहितने ३३२ धावा केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर आयपीएल २०१७ हंगाम आहे. २०१७ हंगामात रोहितने ३३३ धावा केल्या होत्या. त्याने पाचव्या क्रमांकावर आहे २००९ हंगाम. आयपीएल २००९ मध्ये रोहितच्या बॅटमधून ३६२ धावा निघाल्या होत्या.
रोहित शर्मासाठी सर्वात निराशाजनक ठरलेला आयपीएल हंगाम
३६२ धावा – आयपीएल २००९
३३३ धावा – आयपीएल २०१७
३३२ धावा – आयपीएल २०२०
२८६ धावा – आयपीएल २०१८
२६८ धावा – आयपीएल २०२२*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-





