---Advertisement---

केकेआरविरुद्ध निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळणार आरसीबी, कारण वाचून कराल कौतुक

On: रविवार, मे 2, 2021 11:39 PM
---Advertisement---

संपूर्ण भारतात कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या कठीण परिस्थितीत सर्वच क्षेत्रांकडून कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी होणाऱ्या योध्यांच्या सन्मानार्थ उपक्रम राबविले जात आहेत. या सर्वांमध्ये आयपीएल संघ रॉयल चॅलेंजेस बेंगलोर देखील पुढे आला आहे. बेंगलोरने आगामी सामन्यात निळ्या रंगाच्या जर्सी मध्ये उतरून कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेंगलोरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून संघाची जर्सी प्रसिद्ध करत आपला निर्णय जाहीर केला आहे. बेंगलोरने आपल्या ट्विट मध्ये लिहले की, आम्ही कोरोना काळात लढा देणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ हा बदल करत आहोत. दरम्यान बेंगलोरच्या आयपीएल मधील कामगिरीचा विचार केला असता संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी केलेली आहे. त्यांचे 7 सामन्यात 5 विजय व केवळ 2 पराभवांसह 10 गुण आहेत.

दरम्यान आरसीबीच्या नुकत्याच झालेल्या सामन्याचा विचार केला असता, पंजाब विरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पंजाबने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावत 179 धावांपर्यंत मजल मारली. पंजाब कडून कर्णधार के एल राहुलने नाबाद 91 तर गेलने 46 धावांची खेळी केली. बेंगलोर कडून काईल जेमिंसन 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरात बेंगलोरचा पूर्ण संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 145 धावाच करू शकला व पंजाबने 34 धावांनी सहज विजय मिळवला. पंजाब कडून या सत्रातील पहिलाच सामना खेळत असलेल्या फिरकीपटू हरप्रीत बारने 3 गडी बाद केले. दरम्यान विजयाची मालिका खंडित झालेल्या आरसीबी संघाकडून आगामी काळात समर्थकांना उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

PBKS vs DC : शिखर धवनच्या संयमी अर्धशतकामुळे दिल्लीची पंजाबवर ७ गड्यांनी मात, गुणतालिकेत गाठले अव्वल स्थान

गोंधळच गोंधळ! विकेट वाचवण्याच्या नादात दोन्ही फलंदाज धावले एकाच एंडला, पाहा व्हिडिओ

व्हिडिओ : सनरायझर्स हैद्राबादची गचाळ फिल्डिंग! बटलर आणि सॅमसनचे सोडले सोपे झेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---