विंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या फ्रन्चायझीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. मागील 7 मोसमात बेंगलोरकडू्न खेळलेला गेल यावर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे.
आयपीएलच्या लिलावात ख्रिस गेलवर सुरवातीला बोली लावण्यास कोणीही उत्सुकता दाखवली नव्हती पण पंजाबने अखेरच्या क्षणी त्याला त्याच्या मुळ किमतीत संघात घेतले.
बेंगलोरने त्याला संघात घेणार असल्याचे सांगुनही घेतले नसल्याचे टाईम्स आॅफ इंडियाला सांगताना गेल म्हणाला, ” मी आयपीएलच्या लिलावात एक मोठा ड्रॉ होतो. मला वाईट वाटले होते कारण बेंगलोरकडून फोन आला होता.”
“त्यांना मी संघात हवा होतो आणि त्यांनी मला संघात घेणार असल्याचे सेंगितले होते. पण त्यांनी मला परत फोन केला नाही. त्यामुळे मला समजून गेले की त्यांना मी नको आहे. पण हे ठीक आहे.”
तो पुढे म्हणाला, “मला वाटतं मी सीपीएल आणि बीपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. आकडेवारी कधीही खोटे बोलत नाही. 21 शतके, सर्वाधिक षटकार असे माझ्या नावावर असूनही ख्रिस गेल एक ब्रँड म्हणून सिद्ध होत नसेल तर मला नाही माहीत अजून काय करायचे. “
तसेच गेल म्हणाला, मला जेव्हा कोणी संघात घेलत नव्हतं तेव्हा आश्चर्य वाटल होत. पण आता सगळं ठीक आहे. मी यातून पुढे गेला आहे. पंजाबकडून खेळण्याची चांगली संधी आहे. कदाचित हे असच घडणार होत. माझ्या नशीबात पंजाबकडून खेळणे लिहीले असेल.
पुढे गेल म्हणाला, “मला जरी आयपीएलच्या लिलावात शेवटच्या फेरीत पंजाबने घेतलं असलं तरी मला चिंता नव्हती. तुम्हाला कधीतरी आयपीएलमधून आणि बाकी क्रिकेटमधूनही बाहेर पडावेच लागणार आहे. याप्रमाणेच मी वर्तमानात जगत असतो”
महत्त्वाच्या बातम्या –
–दादाच्या बॅटची काळजी घ्यायचा सचिन
–पुण्यात चेन्नईचा बोलबाला, विजयाची शंभरी पार करणारा दुसराच संघ
–द्रविडचा साधेपणा पुन्हा चर्चेत, प्रेक्षकांमध्ये बसुन पाहिला आयपीएलचा सामना
–ऑस्ट्रेलिया विरूध्द दिवस-रात्र कसोटी खेळण्यास भारताचा नकार!
–संपूर्ण वेळापत्रक: असा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा