मुंबई। शुक्रवारी (१३ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात ६० वा सामना झाला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने ५४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह पंजाबने प्लेऑफच्या शर्यतीतील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. मात्र, बेंगलोरच्या नावावर या पराभवामुळे एक नकोसा विक्रम झाला आहे.
पंजाब विरुद्ध बेंगलोरने (Royal Challengers Bangalore vs Punjab Kings) ५४ धावांनी पराभव स्विकारला, त्यामुळे बेंगलोरची ही त्यांच्या कारकिर्दीतील १५ वी वेळ होती, जेव्हा त्यांनी ५० किंवा जास्त धावांनी पराभव स्विकारला आहे. बेंगलोरने आत्तापर्यंत आयपीएलव्यतिरिक्त चॅम्पियन्स लीग स्पर्धाही त्यांच्या कारकिर्दीत खेळली आहे.
त्यामुळे या सर्वांचा विचार करता बेंगलोर (RCB) सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी पराभूत होणारा आयपीएल संघ बनला आहे. यापूर्वी हा विक्रम बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांच्या नावावर होता. पण, आता बेंगलोरने दिल्लीला मागे टाकले आहे. दिल्लीने १४ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी पराभव स्विकारला आहे (Losing most matches by 50+ runs margin).
बेंगलोरला पंजाबने दिला पराभवाचा धक्का
या सामन्यात (RCB vs PBKS) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. पण पंजाबने बेंगलोरचा हा निर्णय प्रथमत: चूकीचा ठरवत २० षटकात ९ बाद २०९ धावा केल्या. पंजाबकडून जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोनने आक्रमक खेळ केला. बेअरस्टोने २९ चेंडूत ६६ धावांची खेळी केली, तर ४२ चेंडूत लिव्हिंगस्टोनने ७० धावांची खेळी केली. बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर २१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला २० षटकात ९ बाद १५५ धावाच करता आल्या. बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. तसेच रजत पाटिदारने २६ आणि विराट कोहलीने २० धावांची खेळी केली. मात्र, या तिघांव्यतिरिक्त एकालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. पंजाबकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
एकदम जबराट! मॅक्सवेलचा स्विच हिट पाहून विराटही आला जोशमध्ये; चाहरला भिरकावला जबरदस्त षटकार
एकच नंबर! भारताची ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच थॉमस कपच्या फायनलमध्ये एन्ट्री, वाचा कामगिरी