Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘विसरून जा तुझं लग्न झालेलं अन् तुला मुलगी होती’, खराब फॉर्मातील विराटला इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ला

'विसरून जा तुझं लग्न झालेलं अन् तुला मुलगी होती', खराब फॉर्मातील विराटला इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ला

May 14, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli-IPL

Photo Courtesy: iplt20.com


एकदाही आयपीएलचा किताब न पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची बॅट या हंगामात शांत आहे. हीच बेंगलोर संघाची सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. धावांचा रतीब घालणाऱ्या विराटने या हंगामात १३ सामने खेळताना फक्त १९.६७च्या सरासरीने २३६ धावा चोपल्या आहेत. यामध्ये फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. या धावा त्याने ११३.४६च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. विराटच्या या खराब कामगिरीमुळे त्याला अनेक आजी-माजी दिग्गज सल्ला देत आहेत. अशात इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनीही विराटला सल्ला दिला आहे.

विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी हा हंगाम किती खराब जात आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, तो या हंगामात तीन वेळा पहिल्या चेंडूवर बाद झाला आहे. शुक्रवारी (दि. १३ मे) पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनीही विराटला सल्ला (Michael Vaughan Advice To Virat Kohli) दिला होता. ते म्हणाले होते की, “बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने कोहलीला सांगावे की, त्याने केलेले विक्रम आणि जागतिक क्रिकेटमधील आपला दर्जा विसरून फक्त सामन्याचा आनंद घे. पहिल्या १० चेंडूंमध्ये तो तरुणपणा दाखवला, तर कोहली मोठी खेळी खेळू शकतो.”

“आशा करतो की, फाफ डू प्लेसिस विराटशी चर्चा करेल. तसेच, त्याला म्हणेल की, ‘१० वर्षे मागे जा, जेव्हा तू इतका मोठा खेळाडू नव्हता. तुझं लग्न झालं नव्हतं आणि तुला मुलही नव्हतं. तू मैदानावर उतरताच गोलंदाजांवर आक्रमण करायचा. आपले वय विसरून जा आणि विसरून जा तू काय केले आहे,'” असेही पुढे बोलताना मायकल वॉन (Michael Vaughan) म्हणाले होते.

विराटच्या धावांबद्दल बोलताना वॉन म्हणाले होते की, “मला वाटते की, त्याने ३५ धावा केल्या, तर तो मोठी धावसंख्या उभारू शकतो. तो सध्या ०-१० यादरम्यान पोहोचण्यासाठीच संघर्ष करत आहे. तो या कठीण काळातून निघाला आणि त्याने युवा जोश दाखवला, तर तो खतरनाक खेळाडू ठरू शकतो.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

विराटने पंजाबविरुद्धच्या या सामन्यात फक्त २० धावा केल्या. मात्र, यावेळी त्याने १ धाव पूर्ण करताच आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू बनला. त्याने आयपीएलमधील ६५०० धावांचा टप्पा पार केला आहे. यामध्ये ५ शतके आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी आणखी करू तरी काय?’, अवघ्या २० धावांवर तंबूत परतताना विराटची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद; चाहतेही दु:खी

आयपीएलमधील ६० सामन्यांनंतर गुणतालिकेत मोठा बदल; पंजाबला प्लेऑफमध्ये एंट्री करण्यासाठी कसे आहे समीकरण?

जे १५ वर्षात कुणाला जमलं नाही, ते बेअरस्टोने करून दाखवलं! दिग्गज जयसूर्याच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी


ADVERTISEMENT
Next Post
India-Badminton

एकच नंबर! भारताची ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच थॉमस कपच्या फायनलमध्ये एन्ट्री, वाचा कामगिरी

Glenn-Maxwell

एकदम जबराट! मॅक्सवेलचा स्विच हिट पाहून विराटही आला जोशमध्ये; चाहरला भिरकावला जबरदस्त षटकार

Virat-Kohli-and-Faf-du-Plessis

अरेरे! पंजाबविरुद्ध पराभव तर झालाच, पण आरसीबीने 'या' नकोशा यादीतही पटकावला अव्वल क्रमांक

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.