---Advertisement---

RCB vs CSK: चेन्नईनं जिंकलेला सामना गमावला, ‘या’ खेळाडूनं सीएसकेच्या तोंडचा घास हिरावला!

---Advertisement---

आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये चेन्नई सुपर किंग्जने नववा सामना हरला. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2 धावांनी निसटता विजय मिळवला, चेन्नईला शेवटच्या षटकात 15 धावांची आवश्यकता होती पण धोनी, जडेजा आणि शिवम दुबे संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

टाॅस गमावून पहिल्या डावात खेळताना आरसीबीने मर्यादित 20 षटकांत 213 धावा केल्या, लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेने शानदार सुरुवात केली. संघाने केवळ 5व्या षटकात सलामी जोडीने 50 धावांचा टप्पा गाठला. पण शेख राशीद 14 धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सॅम करन देखील फार काळ क्रिझवर टिकला नाही, तो ही 5 धावा काढून बाद झाला.

यानंतर चाैथ्या क्रमांकावर आलेल्या रवींद्र जडेजाने आयुष म्हात्रे सोबत निर्णायक भागीदारी केली. दोघांनी मिळून 114 धावांची भागीदारी रचली. जो पर्यंत हे दोघे क्रीझवर होते तो पर्यंत सामना सीएसकेच्या हातात होता. पण जेव्हा म्हात्रे 16.2 षटकांत बाद झाला तेव्हा आरसीबीने सामन्यात पुनरागमन केले. लुंगी एन्गिडीने सलग दोन विकेट्स घेऊन सामना फिरवला. त्याने 17व्या षटकात आयुष म्हात्रे (94) व डेवाॅल्ड ब्रेविसला (0) बाद केले. लुंगी एन्गिडीने सामन्यात आरसीबीसाठी निर्णायक भूमिका बजावली. त्याने 4 षटकात 30 धावा दिल्या, पण 3 मोठ्या विकेट्सही त्याने घेतल्या.

चेन्नई सुपर किंग्जने 19 षटकात चार विकेट गमावून 199 धावा केल्या. संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 15 धावांची आवश्यकता होती. रजत पाटीदारने चेंडू जलदगती गोलंदाज यश दयालकडे सोपवला. यश दयालच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीने धाव घेतली. त्यानंतर, दुसऱ्या चेंडूवर जडेजा फक्त एक धाव करू शकला. यशने तिसऱ्या चेंडूवर एमएस धोनीला एलबीडब्ल्यू बाद करून बंगळुरूला मोठे यश मिळवून दिले.

शिवम दुबेने येताच चौथ्या चेंडूवर षटकार मारला. हा चेंडूही नो बॉल ठरला. तथापि, शिवम फ्री हिटवर फक्त एक धाव करू शकला. पाचव्या चेंडूवर जडेजा फक्त एक धाव करू शकला. चेन्नईला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 4 धावांची आवश्यकता होती पण शिवम फक्त एक धाव करू शकला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---