---Advertisement---

विराटच्या नावावर आयपीएलचा महाविक्रम! भविष्यातही कोणाला नाही जमणार अशी कामगिरी

Virat Kohli
---Advertisement---

आयपीएलच्या मैदानात शनिवारी (6 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅफिटल्स संघ आमने सामने होते. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीसाठी डू प्लेसिस आणि विराट कोहली डावाची सुरुवात करण्यासाठी आले. पण सामना सामना सुरू होऊन काही वेळ होताच विराटच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला. विराट आयपीएलमध्ये 7000 धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

आरसीबीने आपला शेवटचा सामना लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध खेळला होता. लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवला होता. विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यात 30 चेंडूत 31 धावांचे योगदान देऊ शकला. या 31 धावांच्या खेळीनंतर विराटच्या आयपीएल धावांचा आकडा 6988 झाला होता. शनिवारी (6 मे) दिल्ली कॅफिटल्सविरुद्ध विराटने 12 धावा करताच आपल्या 7000 धावा आयपीएल धावा पूर्ण केल्या. या धावा विराटने 233 सामन्यांमधील 225 डावांमध्ये केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांचा विचार केला, तर विराट कोहलीनंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे. धवनने 213 सामन्यांतील 212 डावांमध्ये 6536 धावा केल्या आहेत. धवन देखील लवकरच 7000 आयपीएल धावा पूर्ण करेल. पण अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू मात्र नेहमी विराट कोहलीच राहील. शिखर धवनने जरी 7000 धावा केल्या, तरी इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू म्हणून त्याची नोंद केली जाईल. यादीत तिसरा क्रमांक ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नर याचा आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 171 डावांमध्ये 6189 धावा (आरसीबीविरुद्ध खेळण्यापूर्वी) केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितच्या नावावर 232 डावांमध्ये 6063 धावांची नोंद आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली – 7000+ (225 डाव)
शिखर धवन – 6536 (212 डाव)
डेविड वॉर्नर – 6189 (171 डाव)
रोहित शर्मा – 6063 (232 डाव)

(RCB vs DC । VIRAT KOHLI BECOMES THE FIRST PLAYER TO COMPLETE 7000 RUNS IN IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
13 वर्षानंतर चेपाॅकवर मुंबईचा पराभव, विजयासह चेन्नई गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी
राजधानीत टॉस जिंकत बेंगलोरचा फलंदाजाची निर्णय, संघात केदार जाधवची एन्ट्री; पाहा प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---