---Advertisement---

RCB vs GT: आयपीएल प्लेऑफ सामन्यांमध्ये विराट कोहलीचा रेकॉर्ड कसा आहे? आकडेवारी गतविजेत्याची डोकेदुखी…

On: मंगळवार, मे 26, 2026 5:00 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये आज (२६ मे) क्वालिफायर १ सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला जाणार आहे. धरमशालेत खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात कोण वरचढ ठरले याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या हंगामात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, यामुळे संघाला त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. त्याने आतापर्यंत सुरू असलेल्या हंगामात १४ सामन्यांत ५० पेक्षा अधिकच्या सरासरी आणि १६३.८२ च्या स्ट्राईक रेटने ५५७ धावा केल्या आहेत. मात्र त्याची प्लेऑफमधील आकडेवारी गतविजेत्याची डोकेदुखी वाढवणारी आहे.

विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत २८१ असे सर्वाधिक सामने खेळताना ९२१८ धावा केल्या आहेत. यामध्ये ९ शतके आणि ६७ अर्धशतकांचा समावेश आहे. जेव्हा मात्र प्लेऑफचा विषय येतो, तेव्हा त्याची फलंदाजी ढिसाळ होते. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत १७ आयपीएल प्लेऑफ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने केवळ २६.४ च्या सरासरीने ३९६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोनदाच अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच एका सामन्यात तर त्याला खातेही उघडता आले नव्हते.

आरसीबीने पहिले आयपीएल विजेतेपद जिंकण्यासाठी १८ वर्षांची प्रतीक्षा केली. मागील वर्षी त्यांनी हे विजेतेपद जिंकले, तेव्हा क्वालिफायर १ सामन्यात विराटने पंजाब किंग्ज विरुद्ध केवळ १२ धावा केल्या होत्या, मात्र त्याच हंगामाच्या अंतिम सामन्यात पंजाब विरुद्ध ४३ धावांची उल्लेखनीय खेळी केली होती.

विराटने २०१६ मध्ये गुजरात लायन्स विरुद्ध खातेही उघडले नव्हते. आयपीएल प्लेऑफच्या सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम खेळी नाबाद ७० असून जी त्याने २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या क्वालिफायर १ मध्ये केली होती. हे त्याचे प्लेऑफमधील पहिले अर्धशतक ठरले.

विराटने २०१६ मध्येच सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्धशतक केले होते. त्याने ५४ धावा केल्या होत्या, मात्र संघाने सामना गमावला होता.

विराट कोहलीची प्लेऑफ सामन्यांमधील कामगिरी (आयपीएल)-
२४ धावा विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, उपांत्य सामना २००९
७ धावा विरुद्ध डेक्कन चार्जर्स, अंतिम सामना २००९
९ धावा विरुद्ध मुंबई इंडियन्स, उपांत्य सामना २०१०
७० धावा विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, क्वालिफायर १, २०११
८ धावा विरुद्ध मुंबई इंडियन्स, क्वालिफायर २, २०११
३५ धावा विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, अंतिम सामना २०११
१२ धावा विरुद्ध राजस्थान रॉयल्स, एलिमिनेटर, २०१५
१२ धावा विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, क्वालिफायर २, २०१५
० विरुद्ध गुजरात लायन्स, क्वालिफायर १, २०१६
५४ धावा विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद, अंतिम सामना २०१६
६ धावा विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद, एलिमिनेटर, २०२०
३९ धावा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, एलिमिनेटर, २०२१
२५ धावा विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, एलिमिनेटर, २०२२
७ धावा विरुद्ध राजस्थान रॉयल्स, क्वालिफायर २, २०२२
३३ धावा विरुद्ध राजस्थान रॉयल्स, एलिमिनेटर, २०२४
१२ धावा विरुद्ध पंजाब किंग्ज, क्वालिफायर १, २०२५
४३ धावा विरुद्ध पंजाब किंग्ज,अंतिम सामना २०२५

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---