राॅयल्स चॅलेंजर्स बॅंगलोरने आयपीएल २०२२ च्या सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला ३ विकेट्सने पराभूत केले. फाफ डु प्लेसीसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आयपीएलच्या १५ व्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. या सामन्यात वानिंदु हसरंगाला साममानावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने ४ षटकात २० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तसेच दिनेश कार्तिकने या सामन्याच्या शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार तर दूसऱ्या चेंडूवर चौकार लगावत संघाला सामना जिंकवून दिला.
वेस्ट इंडिजचे खेळाडू प्रामुख्याने विकेट घेतल्यानंतर विचित्र पद्धतीने आनंद साजरा करताना दिसतात. परंतु श्रीलंकेच्या या अष्टपैलूने (Wanindu hasaranga) केकेआरविरुद्धच्या सामन्यात विकेट घेतल्यानंतर वेगळ्या पद्धतीने आनंद साजरा केला. या सामन्यानंतर त्याने या विशेष सेलिब्रेशनचे कारण सुद्धा सांगितले आहे.
हसरंगा सामन्यानंतर म्हणाला, “जेव्हा मी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलो तेव्हा परिस्थीती गंभीर होती, मी ४ धावा करुनच बाद झालो. मी माझ्या कामगिरीवर खुश आहे. मैदानात दव खुप होते, त्यामुळे फलंदाजी करणे कठीण जात होते.”
आपल्या विकेट घेतल्यानंतरच्या स्पेशल सेलिब्रेशनवर तो म्हणाला, ‘माझा आवडता फुटबाॅलर नेमार आहे आणि असा आनंद साजरा करण्याची त्याची पद्धत आहे. जेव्हा मी मैदानावर खेळण्यास उतरतो, तेव्हा मी तणाव घेत नाही, त्यामुळे मला यश मिळते.’
That's a four-wicket haul for Wanindu Hasaranga 👏👏
Live – https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/oGFdYY4PNc
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीसने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने केकेआर संघाला हसरंगाच्या शानदार गोलंदाजीमुळे १२८ धावांवरच रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली राहिली नाही. कर्णधार डु प्लेसीस ५ तर विराट कोहली १२ धावांवर बाद झाला. डेविड विली १८ तर रुदरफोर्ड २८ धावांवर बाद झाला. शेवटी दिनेश कार्तिकच्या ७ चेंडू १४ धावांच्या मदतीने संघाने विजय मिळवला. आरसीबी ५ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपला तिसरा सामना खेळताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल इतिहासातील सर्वात खराब रिव्ह्यू! आरसीबीच्या कर्णधाराची सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरची १९व्या षटकात ‘मोठी’ चूक, गमावला हाताशी आलेला सामना!
गोंधळच गोंधळ! आरसीबीचे दोन्ही फलंदाज एकाच बाजूला धावले, तरीही बाद नाही झाले- Video