---Advertisement---

आरसीबीविरुद्ध शतकी खेळी केल्याबद्दल केएल राहुलचे रोहित शर्माने केले कौतुक, म्हणाला…

On: शुक्रवार, सप्टेंबर 25, 2020 8:28 PM
---Advertisement---

काल 24 सप्टेंबर रोजी आयपीएलमध्ये झालेल्या सहाव्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर बंगलोरला 97 धावांनी पराभूत केले. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात शतक ठोकले. या हंगामातील हे पहिलेच शतक आहे. आयपीएलच्या इतिहासातील राहुलचे हे दुसरे शतक आहे. त्याने 69 चेंडूत 14 चौकार आणि सात षटकारांसह 132 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर पंजाबने अखेरच्या पाच षटकांत 80 धावा केल्या.

राहुलच्या या खेळीचे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने ट्विटरवर कौतुक केले आहे. तो म्हणाला, “केएल राहुलने चांगली फटकेबाजी केली.हे दमदार शतक होत.”

https://twitter.com/ImRo45/status/1309165051631276032

रोहितच्या या ट्विटला उत्तर देताना केएल राहुलने ट्विट केले आहे की ‘धन्यवाद रोहित, तूझ्या मागच्या खेळीतून प्रेरणा घेतली.’ रोहितने बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना ८० धावांची खेळी केली होती.

https://twitter.com/klrahul11/status/1309401563715100672

राहुलने केला विक्रम

या सामन्यात राहुलने त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे. या शतकाच्या जोरावर राहुल आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. याचबरोबर तो सर्वात वेगवान 2000 धावा काढणारा भारतीय फलंदाजही बनला आहे . त्याने मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरचा आठ वर्षांचा विक्रम मोडला. सचिनने 63 डावात 2000 धावा केल्या होत्या, तर राहुलने 60 डावात 2000 धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने आरसीबीसमोर 207 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल आरसीबीचा संघ फलंदाजीला आला आणि 17 षटकांत 109 धावांवर बाद झाला. पंजाबकडून फिरकीपटू मुरुगन अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

विराट कोहलीची खराब कामगिरी

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने निराश केले. प्रथम क्षेत्ररक्षण करताना त्याने राहुलचे दोन झेल सोडले. राहुल 85 आणि 92 धावांवर खेळत असताना कोहलीने त्याचे झेल सोडले. यानंतर फलंदाजी करतांना केवळ एक धाव करून बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने बाद केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---