मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 10 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज(28 सप्टेंबर) दुबईमध्ये खेळला जाईल. या हंगामात प्रथमच भारताचा सुपरस्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा समोरासमोर येणार आहेत. बेंगलोरच्या विरोधात मुंबईचा संघ नेहमीच वरचढ ठरला आहे. या दोन संघांमधील शेवटच्या 10 सामन्यात कोहलीचा संघ मुंबईच्या संघाला केवळ 2 वेळा पराभूत करू शकला आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार्या सामन्यात आपल्या संघाला जिंकून देण्याची जबाबदारी ही गोलंदाजांवर आहे. या हंगामात आतापर्यंत येथे 4 सामने खेळले गेले आहेत. चारही सामन्यात कोणताही संघ येथे धावांचा यशस्वी पाठलाग करू शकला नाही. दिल्ली आणि पंजाब यांच्यात खेळलेला सामना निश्चितच सुपर ओव्हरमध्ये गेला होता, पण या सामन्यातही प्रथम फलंदाजी करणार्या दिल्ली संघाने सामना जिंकला.
रोहितला 5000 धावा करण्याची संधी –
रोहित आयपीएलमध्ये 5000 धावा करण्यापासून 10 धावा दूर आहे. त्याने 190 सामन्यात 31.78 च्या सरासरीने 4990 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त दोन फलंदाजांनी 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. कोहलीने 178 सामन्यात 37.68 च्या सरासरीने 5426 धावा केल्या आहेत आणि रैनाने 193 सामन्यात 33.34 च्या सरासरीने 5368 धावा केल्या आहेत.
एक विजय आणि एक पराभव
मुंबई आणि बेंगलोरचा या हंगामातील हा तिसरा सामना आहे. यापूर्वी दोन्ही संघांनी 2 सामन्यात एक सामना जिंकला आहे आणि त्यांना एक पराभव पत्करावा लागला आहे. हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा चेन्नईने पराभव केला. त्याच वेळी बेंगलोरला पंजाबकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
दोन्ही संघांचे महागडे खेळाडू
कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचा सर्वात महागडा खेळाडू आहे. संघ त्याला हंगामातील 15 कोटी मिळणार आहे. त्याच्यानंतर हार्दिक पंड्याचा क्रमांक येतो, त्याला हंगामात 11 कोटी मिळतील. त्याचवेळी कर्णधार कोहली हा आरसीबीमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. संघ त्याला हंगामात 17 कोटी देईल. त्याच्यानंतर एबी डिव्हिलियर्सचे नाव आहे, ज्याला या हंगामात 11 कोटी रुपये मिळतील.
सर्वाधिक वेळा मुंबईने जेतेपद जिंकले
मुंबईने आयपीएलच्या इतिहासात 4 वेळा (2019, 2017, 2015, 2013) जेतेपद जिंकले आहे. गतवर्षी त्यांनी अंतिम सामन्यात चेन्नईचा 1 धावांनी पराभव करत मुंबईने चौथे विजेतेपद जिंकले होते. मुंबईने आतापर्यंत 5 वेळा अंतिम सामना खेळला आहे. त्याच वेळी, बेंगलोरने आतापर्यंत 3 वेळा अंतिम फेरी खेळली (2009, 2011, 2016) पण तीन वेळा जेतेपद जिंकू शकले नाही.
आमने-सामने
आयपीएलमध्ये मुंबई आणि बेंगलोर यांच्यात मुंबईचा संघ वरचढ ठरला आहे. आतापर्यंत या दोघांमध्ये 27 सामने खेळले गेले आहेत. मुंबईने 18 तर बेंगलोरने 9 सामने जिंकले आहेत. शेवटच्या हंगामात बेंगलोरला मुंबईला एकदासुद्धा पराभूत करता आले नाही.
खेळपट्टी आणि हवामान अहवाल
दुबईतील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ राहिल. तापमान 27 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे. खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथील खेळपट्टी धीमी असल्याने फिरकीपटूनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.
या मैदानावर एकूण टी 20 सामने: 62
प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला: 34 वेळा
प्रथम गोलंदाजी करणारा संघ जिंकलाः 26 वेळा
पहिल्या डावात संघाची सरासरी धावसंख्या: 144
दुसर्या डावात संघाची सरासरी धावसंख्या: 122





