---Advertisement---

जितेश शर्मा बनला सुपरमॅन! हवेत उडत घेतला जबरदस्त कॅच, पाहा VIDEO

On: शुक्रवार, मे 30, 2025 6:33 AM
---Advertisement---

आयपीएल 2025च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीनं पंजाब किंग्जचा एकतर्फी पराभव केला. (IPL 2025- RCB VS PBKS) पंजाबच्या फलंदाजांनी खूपच खराब कामगिरी केली आहे. (RCB beat PBKS by 8 wickets) संघाचा एकही फलंदाज क्रीजवर आत्मविश्वासाने फलंदाजी करू शकला नाही. यामुळे संघ 20 षटकेही न खेळता फक्त 101 धावांवर ऑलआउट झाला. या सामन्यात आरसीबीचा यष्टिरक्षक जितेश शर्माने एक उत्तम झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Jitesh Sharma Catch)

पंजाब किंग्जच्या फलंदाजांचा आरसीबीच्या गोलंदाजांसमोर टिकाव लागू शकला नाही. आरसीबीकडून सुयश शर्मा, जोश हेझलवूड आणि यश दयाल यांनी चांगली गोलंदाजी केली. आरसीबीडून हेझलवूडने 15वे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पंजाबचा फलंदाज अझमतुल्लाह उमरझाईने मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटच्या टोकाच्या वरच्या दिशेने जात होता. त्यानंतर यष्टिरक्षक जितेशने हवेत लांब उडी मारली चेंडू पकडला.

पाहा व्हिडिओ-

पंजाब किंग्जने अझमतुल्ला उमरझाईच्या रूपात त्यांची 10वी विकेट गमावली. आरसीबीकडून जोश हेझलवूड आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. यश दयालने दोन विकेट घेतल्या. या गोलंदाजांमुळेच पंजाब किंग्ज संघ मोठा धावसंख्या करू शकला नाही. PBKS All out On 101 vs RCB

पंजाब किंग्जकडून फक्त तीन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. यामध्ये मार्कस स्टोइनिस (26 धावा), अझमतुल्ला उमरझाई (18 धावा) आणि प्रभसिमरन सिंग (18 धावा) यांचा समावेश होता. उर्वरित फलंदाज क्रीजवर टिकून राहण्यासाठी झगडत राहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---