---Advertisement---

अर्रर्र! आरसीबीसाठी ट्रेनिंग सुरू करूनही मॅक्सवेल खेळणार नाही आजचा सामना; पण कधी उतरणार मैदानात?

On: मंगळवार, एप्रिल 5, 2022 3:56 PM
Glenn-Maxwell
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामातील १३वा सामना राजस्थान राॅयल्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात आरसीबीचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल खेळताना दिसणार नाही. मॅक्सवेल आपला विवाह सोहळा संपवून नूकताच आरसीबी संघामध्ये सामील झाला, परंतु मंगळवारी (०५ एप्रिल) होणाऱ्या सामन्यात तो खेळणार नाही. त्याने आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असून तो सध्या संघासाठी सराव करत आहे. आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी सांगितले की, मॅक्सवेल ०९ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. 

ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दौऱ्यावर असून तेथे तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळली. आता संघ ५ एप्रिलला १ टी२० मालिका खेळणार आहे, परंतु मॅक्सवेल हा पाकिस्तान दौऱ्यामध्ये सहभागी नव्हता. मॅक्सवेल (Glenn Maxwell) त्याची प्रेयसी विनी रमणसोबत लग्न बंधणात अडकला आहे. या दोघांनी दोन वर्षांपूर्वी साखरपूडा केला होता. विनी ही भारतीय वंशाची आहे. त्यामुळे मॅक्सवेल आणि विनीचे रविवारी (२७ मार्च) भारतीय पद्धतीने लग्न झाले. तसेच त्याआधी १८ मार्च रोजी त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनेही लग्न केले. लग्नामुळे तो आयपीएलच्या सुरुवातीला उपलब्ध नव्हता.

आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट सांगितले आहे की, कोणताही करारात असलेला खेळाडू ०६ एप्रिलच्या अगोदर आयपीएलसाठी उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे ते कधी पोहोचतात हे महत्त्वाचे ठरत नाही. कारण, ते ०६ एप्रिलच्या अगोदर खेळू शकत नाहीत. बाकी संघांप्रमाणे आम्हालासुद्धा माहिती आहे. यामुळे आम्ही यानुसार योजना आखली आहे.”

आरसीबीने आत्तापर्यंत २ सामने खेळले असून २ पैकी एका सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर एका सामन्यात संघाला यश आले आहे. मॅक्सवेल ०१ एप्रिलला मुंबईमध्ये आयपीएलसाठी परतला आहे. त्यानंतर त्याने आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून आता सराव करत आहे. परंतु तो क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आदेशानुसार ०५ एप्रिलला होणाऱ्या सामन्यात खेळणार नाही.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

फक्त ४ विकेट्स आणि ‘भुवी’ मोडणार चहल, अश्विन अन् नारायणचा ‘हा’ मोठा विक्रम

शाहरुख खानच्या टीमकडून खेळणार वेस्ट इंडिजचे ‘हे’ दोन विस्फोटक फलंदाज; विरोधी संघांच्या बत्त्या करणार गुल

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दीपक हुड्डा अन् केएल राहुलची मोठी झेप; टॉप-५मध्ये मिळवले ‘हे’ स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---