---Advertisement---

RCB vs SRH: ‘हा’ ठरला हैदराबादच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

---Advertisement---

(IPL 2025: RCB vs SRH) आयपीएल 2025 मधील 65वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला. हा सामना पूर्णपणे हैदराबादच्या नावे राहिला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात संघाने पहिल्या डावात खेळताना मर्यादित 20 षटकात 6 गडी गमावून 231 धावा केल्या. ज्याला प्रत्युत्तर म्हणून आरसीबीला केवळ सर्व विकेट गमावून 19.5 षटकांत 189 धावा करता आल्या. या विजायात हैदराबाद संघाची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. (SRH BEAT RCB BY 42 RUNS)

हैदराबादनं दिलेल्या 232 धावांचा पाठलाग रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दमदार सुरुवातीने केला. विराट कोहलीने केवळ 25 चेंडूत झंझावाती 43 धावा फटकावत पहिल्यापासूनच दबदबा निर्माण केला. त्याला फिल साॅल्टची जबरदस्त साथ मिळाली, ज्याने अवघ्या 32 चेंडूत 62 धावांची आक्रमक खेळी केली. दोघांनी मिळून अवघ्या 7 षटकांत 80 धावांची भागीदारी करत सामन्यावर पकड बसवली होती. (RCB GREAT START WHILE CHASING 230+ SCORE)

मात्र त्यानंतर बेंगळुरूच्या डावाला गळती लागली. मयंक अग्रवाल फक्त 11 धावांवर माघारी परतला, तर रजत पाटीदारने 18 धावा केल्या. तर रोमारियो शेफर्ड शून्यावर बाद झाला. दुसऱ्या डावात 16व्या हैदराबादकडून इशान मलिंगाने सामना पलटवून देणारे षटक टाकले. ज्यात त्याने 2 विकेट्स घेऊन हैदराबादला सामन्यात आणले. प्रथम त्याने षटकाच्या चाैथ्या चेंडूवर रजत पाटीदारला धावबाद केला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर शेफर्डला काॅटन बोल्ड करुन बाद केला. (Turning Point Of the match)

त्यानंतर कर्णधार जितेश शर्माने काहीसा प्रतिकार करत 15 चेंडूत 24 धावा केल्या. पण खालच्या फळीतील फलंदाजांनी फारशी साथ दिली नाही. शेवटी शेवटच्या षटकात बेंगळुरूचा डाव आटोपला. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने जबरदस्त कामगिरी करत सर्वाधिक 3 बळी टिपले आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने वळवला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---