---Advertisement---

हा तर RCBचा धोनी! भावाने स्टंप्सकडे न पाहताच अश्विनला केले यष्टीचीत, ‘नो लूक’ Runout व्हिडिओ व्हायरल

On: रविवार, मे 14, 2023 9:28 PM
Anuj-Rawat
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअममधील आयपीएल 2023चा सामना खूपच खास ठरला. बेंगलोरने या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला अवघ्या 59 धावांवर सर्वबाद करत 112 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या विजयामुळे बेंगलोर संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचलाच. आता संघाच्या विजयापेक्षा जास्त चर्चा बेंगलोरचा यष्टीरक्षक अनुज रावत याची सुरू आहे. त्याचा सामन्यादरम्यान एमएस धोनी याच्यासारखे ‘नो लूक’ अवतारात फलंदाजाला धावबाद केल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

अनुजचा ‘माही’ अवतार
झाले असे की, राजस्थान रॉयल्स संघाने 49 धावसंख्येवर 6 विकेट् गमावल्या होत्या. शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) आणि आर अश्विन (R Ashwin) यांची जोडी संघाचा डाव सांभाळत होती. डावाच्या आठव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर हेटमायरने जोरात फटका मारला आणि चेंडू बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षकाकडे पोहोचला. हेटमायर आणि अश्विनमध्ये गडबड झाली आणि हेटमायरने अश्विनला दुसरी धाव घेण्यास नकार दिला.

अश्विन क्रीझपासून जास्त दूर नव्हता. तसेच, क्षेत्ररक्षकाचा थ्रोदेखील यष्टीरक्षक अनुज रावत (Anuj Rawat) याच्याकडे थेट पोहोचला नव्हता. मात्र, अनुजने चेंडू पकडून मागे न वळून पाहता एमएस धोनी (MS Dhoni) याच्याप्रमाणे चेंडू थेट स्टंप्सवर मारला. अनुजच्या या ‘नो लूक’ धावबादमुळे अश्विनच्या खेळीचाही शेवट झाला. अश्विनला यावेळी एकही चेंडू न खेळता शून्यावर धावबाद होऊन तंबूत परतावे लागले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनुजची वादळी खेळी
यष्टीरक्षणात कमाल करण्यापूर्वी अनुज फलंदाजीतही चमकला. अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजीला उतरलेल्या अनुजने वादळी फलंदाजी केली. त्याने अवघ्या 11 चेंडूत 29 धावांचा पाऊस पाडला. तो यावेळी नाबाद राहिला. अनुजच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर बेंगलोरने 5 विकेट्स गमावत 171 धावा चोपल्या.

राजस्थानचा डाव 59 धावांवर संपुष्टात
आरसीबीच्या गोलंदाजांपुढे राजस्थानच्या फलंदाजांचा टिकाव लागू शकला नाही. स्टार फलंदाजांनी सजलेल्या राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजी फळीला बेंगलोरच्या वेगवान गोलंदाजांपुढे गुडघे टेकावे लागले. यशस्वी जयसवाल आणि जोस बटलर यांना खातेही उघडता आले नाही. तसेच, संजू सॅमसन खराब शॉट खेळून तंबूत परतला. अव्वल 3 फलंदाज बाद झाल्यानंतर राजस्थान संघाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. तसेच, संपूर्ण संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे 59 धावांवर कोसळला. हा राजस्थानची आयपीएलमधील दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली. (rcb wicket keeper anuj rawat runout r ashwin in ms dhoni no look style in rr vs rcb match see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
‘कुठं चुकलो याचाच विचार…’, दारुण पराभवानंतर कॅप्टन संजूचे मोठे विधान
IPLची एकही ट्रॉफी न जिंकणाऱ्या RCBचा भीमपराक्रम! राजस्थानला हरवत नोंदवला खास विक्रम, चेन्नई मागेच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---