---Advertisement---

गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी चोपलं, आरसीबीने मुंबईचा ७ विकेट्सने उडवला धुव्वा; चौथ्या पराभवाची नामुष्की

On: शनिवार, एप्रिल 9, 2022 11:25 PM
Royal-Challengers-Bangalore
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघात शनिवारी (दि. ०९ एप्रिल) आयपीएल २०२२चा १८वा सामना पार पडला. हा सामना बेंगलोर संघाने ७ विकेट्सने खिशात घातला. हा त्यांचा आयपीएल २०२२मधील तिसरा विजय होता. त्यांनी आतापर्यंत ४ सामने खेळलेत, त्यातील फक्त १ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय, तर दुसरीकडे हा मुंबईचा सलग चौथा पराभव होता. बेंगलोर संघाच्या विजयाचा शिल्पकार अनुज रावत ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सामन्यात बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी मुंबईने फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १५१ धावा केल्या आणि बेंगलोरला १५२ धावांचे आव्हान दिले. हे आव्हान बेंगलोर संघाने १८.३ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले.

बेंगलोर संघाचा डाव
बेंगलोर संघाकडून फलंदाजी करताना अनुज रावतने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४७ चेंडूत ६६ धावा केल्या. या धावा करताना २ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त विराट कोहलीने ४८ धावा ठोकल्या. यामध्ये ५ चौकारांचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त कर्णधार डू प्लेसिसने १६ धावा केल्या. तसेच, दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेलने अनुक्रमे ७ आणि ८ धावा केल्या. मॅक्सवेलने विजयी चौकार मारला.

यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना जयदेव उनाडकटला आणि डेवाल्ड ब्रेविसला विकेट घेण्यात यश आले. त्याने बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसची (Faf Du Plessis) विकेट घेतली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३० धावा दिल्या होत्या. ब्रेविसने विराट कोहलीला ४८ धावांवर तंबूत पाठवले.

मुंबईची झुंज अपयशी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३७ धावांचा सामना करताना ६८ धावा ठोकल्या. या धावा करताना ५ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक ईशान किशनने प्रत्येकी २६ धावा केल्या. तसेच, रमणदीप सिंगने ६, डेवाल्ड ब्रेविसने ८ आणि जयदेव उनाडकटनेही १५ धावांचे योगदान दिले होते. विशेष म्हणजे, विस्फोटक फलंदाजी करणारे तिलक वर्मा आणि कायरन पोलार्ड हे शून्य धावांवर बाद झाले.

यावेळी बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त आकाशदीपने १ विकेट खिशात घातली.

उभय संघांच्या गुणतालिकेतील स्थानाबाबत बोलायचं झालं, तर बेंगलोर संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच मुंबई इंडियन्स नवव्या स्थानी आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

कशी नशीबाने थट्टा आज मांडली! मैदानात सोडा नेट्समध्येही विराट फेल, बॅट उगारत व्यक्त केला संताप

गुजरातच्या ‘मॅच विनर’ तेवतियाला महान कर्णधाराने दिले नवे नाव; म्हणाले, ‘त्याच्या रक्तातच…’

युएईत आयपीएल गाजवलेल्या ऋतुराजला मानवेना भारतातील हवामान; आकडेवारीच देतेय साक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---