---Advertisement---

आरसीबीचा विजयरथ सुस्साट, लखनऊला १८ धावांनी लोळवले; फाफ आणि हेजलवुड विजयाचे शिल्पकार

On: मंगळवार, एप्रिल 19, 2022 11:38 PM
RCB-Team
---Advertisement---

लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात मंगळवारी (१९ एप्रिल) आयपीएल २०२२चा ३१वा सामना खेळवला गेला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना झाला. हा सामना जिंकत उभय संघांना गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचण्याची संधी होती. त्यामुळे दोन्हीही संघ या सामन्यात दमदार प्रदर्शन करताना दिसले. परंतु अखेर बेंगलोरने १८ धावांनी हा सामना जिंकला. हा त्यांचा हंगामातील पाचवा विजय आहे. तर लखनऊचा हा तिसरा पराभव आहे.  

या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनऊने प्रथम गोलंदाजी निवडली होती. परिणामी बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ ८ विकेट्स गमावून १६३ धावाच करूच शकला.

जोस हेजलवुडचा भेदक मारा
बेंगलोरच्या १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक धावा फटकावल्या. त्याने २८ चेंडू खेळताना २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४२ धावांची झटपट खेळी केली. कर्णधार केएल राहुल या सामन्यात ३० धावा करून बाद झाला. तसेच मार्कस स्टॉयनिस (२४ धावा), दीपक हुडा आणि आयुष बदोनी (१३ धावा) यांनाही विशेष योगदान देता आले नाही. अष्टपैलू जेसन होल्डरही अंतिम षटकात ८ चेंडूंमध्ये १६ धावाच करू शकला. परिणामी लखनऊ संघ बेंगलोरच्या आव्हानाचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला.

या डावात बेंगलोरकडून जोश हेजलवुडने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत ४ विकेट्स काढल्या. तसेच हर्षल पटेलनेही २ विकेट्स घेतल्या.

फाफ डू प्लेसिसची कर्णधार खेळी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरकडून फाफ डू प्लेसिस याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने ६४ चेंडू खेळताना २ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ९६ धावा फटकावल्या. तसेच शाहबाज अहमदने २६ धावा आणि ग्लेन मॅक्सवेलने २३ धावांची खेळी केली. याखेरीज यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनेही ८ चेंडूंमध्ये नाबाद १३ धावांचे योगदान दिले.

या डावात लखनऊकडून दुष्मंथा चमीरा आणि अष्टपैलू जेसन होल्डर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या. चमीराने तर डावातील पहिल्याच षटकात अनुज रावत आणि विराट कोहलीला लागोपाठ बाद केले होते. याखेरीज कृणाल पंड्याच्याही वाट्याला एक विकेट आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

हसू की रडू? पहिल्याच चेंडूवर विकेट गमावल्यानंतर विराटने दिले असे हावभाव, रिऍक्शन व्हायरल

प्रसिद्ध क्रिकेटपटूचे कॅन्सरमुळे निधन, ४०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

LSGvsRCB | गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचण्यासाठी लखनऊ आणि बेंगलोरमध्ये झुंज, पाहा प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---