---Advertisement---

RRvsRCB | नाणेफेक जिंकत फाफचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, असा आहे राजस्थान आणि बेंगलोरचा संघ

On: मंगळवार, एप्रिल 5, 2022 7:09 PM
Sanju-Samson-Faf-Du-Plesis
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२२चा तेरावा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकत राजस्थानचा संघ विजयाची हॅट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर बेंगलोरचा संघ दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसेल.

तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता या सामन्यासाठी नाणेफेक झाली असून बेंगलोरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

असे आहेत संघ-

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेविड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज

महत्त्वाच्या बातम्या-

‘कर्णधार रोहित सामन्यादरम्यान खेळाडूंना करतो शिवीगाळ’, इशानने मोठा खुलासा करत सांगितले कारण

भुवनेश्वरच्या प्रयत्नांचे व्हायला पाहिजे कौतुक! बाउंड्री लाईनवर असे करत आणली ‘मिस्टर ३६०’ची आठवण

इंस्टाग्रामवर व्यंकटेश आणि तेलुगु अभिनेत्रीचे ‘क्यूट’ चॅट व्हायरल; चाहते म्हणे, ‘यांच्यात काहीतरी शिजतय’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---