आयपीएलच्या या हंगामात यश दयाल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी चमकदार कामगिरी करत आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यानं 3.1 षटकात केवळ 20 धावा देत 3 बळी घेतले. आयपीएल 2024 पूर्वीच्या मिनी लिलावात यशला बंगळुरूनं 5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. यापूर्वी, तो गुजरात टायटन्सचा भाग होता. गेल्या हंगामात केकेआरच्या रिंकू सिंहनं त्याला एकाच ओव्हरमध्ये सलग 5 षटकार लगावले होते. त्यानंतर तो नैराश्येत गेला होता. मात्र आता आरसीबीमध्ये येताच यशच नशीब पालटलं आहे.
2022 च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सनं यश दयालला 3.20 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. परंतु 2023 मध्ये रिंकू सिंहकडून पाच षटकार खाल्यापासून यशचा फॉर्म काही चांगला राहिला नाही. यामुळे टीमनं त्याला 2024 च्या लिलावापूर्वी सोडलं. यशनं 2023 च्या आयपीएल हंगामात 5 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं फक्त 2 विकेट घेतल्या होता. रिंकूकडून लागोपाठ पाच षटकार खाल्यानंतर यशची अवस्था खूप वाईट झाली होती. तो चक्क डिप्रेशनमध्ये गेला होता आणि त्याची तब्येतही लक्षणीयरीत्या खालावली होती.
परंतु बंगळुरूमध्ये आल्यानंतर यश दयालनं त्याचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा संपादन केला. आता आयपीएलच्या या हंगामात त्यानं चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. यश या हंगामात आरसीबीसाठी प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. आतापर्यंत, त्यानं आयपीएल 2024 मध्ये बंगळुरूसाठी 12 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 29.23 च्या सरासरीनं 13 बळी घेतले आहेत. या कालावधीत यशनं 8.80 च्या इकॉनॉमीनं धावा खर्च केल्या.
यश दयालनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 26 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 32.35 च्या सरासरीनं 26 विकेट घेतल्या आहेत. या कालावधीत यशनं 9.43 च्या इकॉनॉमीनं धावा खर्च केल्या. आयपीएल 2024 हा त्याच्यासाठी आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम राहिला, ज्यामध्ये त्यानं सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सलग 5 विजयानंतर अशी आहेत आरसीबीसाठी ‘प्लेऑफ’ची समीकरणं, कोणत्या संघाचा पत्ता होणार कट?
आरसीबीचा सलग 5वा विजय, टॉप 5 मध्ये मारली धडक! प्लेऑफच्या आशा अजूनही कायम
विराट एवढा निष्ठावंत कोणीच नाही! एकाच संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा केला विश्वविक्रम