---Advertisement---

धोनीनं रविवारी चेपॉकमध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला? ‘गार्ड ऑफ ऑनर’ नंतर निवृत्तीच्या चर्चांना वेग

---Advertisement---

आयपीएल 2024 मध्ये रविवारी (12 मे) खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं राजस्थान रॉयल्सचा 5 गडी राखून पराभव केला. हा सामना चेन्नईचं घरचं मैदान म्हणजेच ‘चेपॉक स्टेडियम’वर खेळला गेला. या हंगामात घरच्या मैदानावर चेन्नईचा हा शेवटचा साखळी सामना होता. आता चेन्नईला 18 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गट टप्प्यातील शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.

चेपॉकमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान दोन अशा गोष्टी घडल्या, ज्यामुळे 42 वर्षीय महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना आणखी जोर आला आहे. पहिली गोष्ट म्हणजे या सामन्यात नाणेफेक होण्यापूर्वी सीएसके फ्रँचायझीनं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट टाकून चाहत्यांना खास अपील केलं होतं. या पोस्टनंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग आला आहे.

पोस्टमध्ये सीएसकेनं म्हटलं होतं की, “सामना संपल्यानंतर चाहत्यांनी स्टेडियममध्येच थांबावं, कारण सामन्यानंतर काहीतरी खास घडणार आहे. चाहत्यांना सरप्राईज मिळू शकतं”. या पोस्टनंतर चाहत्यांनी अंदाज लावला की, मॅचनंतर धोनीविषयी काहीतरी बातमी येणार आहे.

 

मात्र सामन्यानंतर मैदानावर वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सर्व खेळाडूंनी आणि कर्मचाऱ्यांनी ‘लॅप ऑफ ऑनर’ अर्थात स्टेडियमभोवती चक्कर मारली. यासह धोनीसोबत सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैनाही दिसला. दरम्यान, धोनीनं चाहत्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून टेनिस बॉल दिले. तसेच धोनीसह सर्व खेळाडूंना सुवर्णपदकही प्रदान करण्यात आले. सर्व खेळाडू एका रांगेत उभे राहिले आणि संघाचे मालक एन श्रीनिवासन यांची मुलगी रूपा गुरुनाथ यांनी खेळाडूंना पदकं दिली. या सोबतच धोनीला त्याच्या सहकारी खेळाडूंनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ही दिला.

 

या सर्व गोष्टींमुळे आता चाहत्यांच्या मनात धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, आतापर्यंत चेन्नई फ्रँचायझी, धोनी किंवा आयपीएलकडून याबाबत कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही.

 

महेंद्रसिंह धोनी यावर्षी 7 जुलैला 43 वर्षांचा होईल. अशा परिस्थितीत हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम मानला जात आहे. ‘माही’नं हा हंगाम सुरू होण्यापूर्वीच संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे चेन्नई सुपर किंग्जची धुरा आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामात धोनी खेळाडू म्हणून नाही, तर मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक अशा नव्या भूमिकेत दिसणार का? याबाबतही अद्याप काहीही स्पष्टता नाही.

सध्याच्या हंगामात चेन्नईचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. गुणतालिकेत ते 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी चेन्नईला आपला उरलेला एकमेव सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘डिप्रेशन’ मधून बाहेर पडून बनला स्टार, आरसीबीमध्ये येताच पालटलं यश दयालचं नशीब!, जाणून घ्या आकडेवारी

सलग 5 विजयानंतर अशी आहेत आरसीबीसाठी ‘प्लेऑफ’ची समीकरणं, कोणत्या संघाचा पत्ता होणार कट?

आरसीबीचा सलग 5वा विजय, टॉप 5 मध्ये मारली धडक! प्लेऑफच्या आशा अजूनही कायम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---