---Advertisement---

RCB विरुद्ध CSK : भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन? जाणून घ्या मोठी अपडेट समोर

On: शुक्रवार, मार्च 28, 2025 4:19 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात शुक्रवार 28 मार्च रोजी सामना चेन्नई मध्ये खेळला जाणार आहे. आरसीबीने स्पर्धेतील सुरुवाती सामना जिंकला आहे. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभव केला होता. आता संघ सीएसके विरुद्ध मैदानात उतरणार आहे. आरसीबीने पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला संधी दिली नव्हती, आता भुवनेश्वरच्या फिटनेसवर मोठी अपडेट समोर आली आहे. आरसीबीचा मेंटर दिनेश कार्तिकने भुवनेश्वर बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

भुवनेश्वरला दुखापतीच्या कारणाने केकेआर विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण आता तो सीएसके विरुद्ध मैदानात उतरू शकतो. याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आली नाही, पण स्टार स्पोर्ट्सच्या एका अपडेटनुसार आरसीबी संघाचा मेंटर दिनेश कार्तिक म्हणाला, जिथपर्यंत मला माहिती आहे आता त्याच्या फिटनेस मध्ये आता कोणतीही अडचण नाही. तो मागच्या सामन्यात खेळू शकला नव्हता, पण सरावादरम्यान त्याने गोलंदाजी केली होती.

भुवनेश्वर कुमारचा आयपीएल रेकॉर्ड्स पाहिल्यास त्याने शानदार कामगिरी केली आहे. त्याने 176 सामन्यात 181 विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वरने मागच्या हंगामात 16 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्यासाठी 2023 आयपीएल हंगाम चांगला राहिला होता, जिथे त्याने 14 सामन्यात 23 विकेट्स घेतल्या होत्या. भुवनेश्वर त्याच्या आईपीएल करिअरमध्ये अनेक संघांसाठी खेळला आहे.

सीएसके विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य संघ :-विराट कोहली, फिल साल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिकल/मोहित राठी, लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेविड, क्रुणाल पांड्या, रसिख सलाम/भुवनेश्वर कुमार/स्वप्निल सिंह, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---