आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील खेळाडू आता त्यांच्या त्यांच्या संघात सामील होत आहेत. विराट कोहली सुद्धा काही दिवसातच आरसीबी कॅम्पमध्ये सामील होईल. कर्णधार रजत पाटीदारसह संघातील बाकीचे खेळाडू सुद्धा आरसीबी कॅम्पमध्ये सहभागी झाले आहेत . त्यातच नुकतेच आता आरसीबीच्या नवीन जर्सी चे अनावरण करण्यात आले. तसेच जाणून घ्या की तुम्हाला आरसीबीची हुबेहुब जर्सी कुठे आणि कधी खरेदी करता येईल.
आरसीबीच्या चाहत्यांना नवीन जर्सी आवडत आहे. तसेच चाहते या विचारात आहेत की 17 मार्चच्या आधी जर्सी चे अनावरण का केले आहे? तर आरसीबीचा अनबॉक्स इवेंट 17 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटत होते की जर्सीचे त्या दिवशीच अनावरण केले जाईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अधिकृतरित्या एक्स ट्विटर अकाऊंटद्वारे सांगितले होते की, आरसिबीची ही हुबेहुब जर्सी 12 मार्च पासून उपलब्ध होणार आहे. चाहते आर सीबीच्या वेबसाइटवरून तसेच पुमा इंडियाच्या वेबसाइट आणि अँपवरून देखील तुम्ही घेऊ शकता.
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या हंगामात स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात करेल. त्यांचा पहिला सामना गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स यांच्याशी होणार आहे. हा सामना ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये होणार आहे.
आरसीबी संघ स्क्वाड
रजत पाटीदार (कर्णधार) विराट कोहली, फिल साल्ट, जितेश शर्मा देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लियाम लिविंगस्टोन, कृणाल पांड्या, स्वप्नील सिंग, टीम डेविड, रोमारिओ शेफर्ड, मनोज भांडगे, जैकब बेथल, जोश हेजलवूड, रसिक दार, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, नुवांत तुषारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, यश दयाल.
हेही वाचा
केएल राहुलने नाकारले दिल्लीचे कर्णधारपद, अक्षर पटेल सांभाळणार दिल्लीची धुरा?
Champions Trophy: विजयानंतर मायदेशी परतला रोहित शर्मा, चाहत्यांनी केलं जंगी स्वागत!
ICCच्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ मध्ये या संघांच्या खेळाडूंना मिळाले नाही स्थान






