रविवारी (9 मार्च) रोजी झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनल सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडला धूळ चारली आणि चॅम्पियन्स ट्राॅफीवर नाव कोरले. (India Won ICC Champions Trophy) यानंतर, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मायदेशी परतला आहे. सोमवारी (10 मार्च) रात्री उशिरा रोहित मुंबई विमानतळावर पोहोचला आणि चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले.
फायनल सामन्यात भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 83 चेंडूत 76 धावांची खेळी केली. आणि 252 धावांच्या लक्ष्यासाठी भारतीय संघाला मोठा आधार दिला. भारताने 1 षटक शिल्लक असताना लक्ष्य गाठले. रोहित विमानतळावर पोहोचताच, त्याच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांनी रोहितचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. रोहितनेही लोकांच्या प्रेमाचे आणि शुभेच्छांचे मनापासून स्वागत केले.
आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये रोहित काळा टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये विमानतळाबाहेर येताना दिसत आहे आणि चाहते त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करत आहेत.
View this post on Instagram
फायनल सामन्यानंतर कर्णधार रोहित म्हणाला, “सध्या मी गोष्टी येतात तशा घेत आहे. खूप पुढे विचार करणे माझ्यासाठी योग्य होणार नाही. सध्या माझे लक्ष चांगले खेळण्यावर आणि योग्य मानसिकता राखण्यावर आहे. मी 2027च्या विश्वचषकात खेळेन की नाही हे मला कोणत्याही रेषेत सांगायचे नाही. सध्या अशी विधाने करण्यात काही अर्थ नाही.?” (Rohit Sharma Statement After Win Champions Trophy)
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मानं मोडला एमएस धोनीचा रेकाॅर्ड, हिटमॅनच नाव सुवर्ण अक्षरात
पीसीबी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर आयसीसीची स्पष्टता; पाकिस्तानला फटकारले
अंतिम सामन्यात संघाला आली ‘या’ खेळाडूची आठवण; कर्णधाराचा खुलासा






