इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम मागील आठवड्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. दरम्यान, या हंगामात झालेल्या २९ सामन्यांमध्ये अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरी सर्वांना प्रभावित केले. यातील एक नाव म्हणजे ३० वर्षीय गोलंदाज हर्षल पटेल. तो या हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याची अशी कामगिरी होण्यामागे विराट कोहलीचा एक संदेश महत्त्वाचा ठरला. याबाबत स्वत: हर्षलने माहिती दिली आहे.
या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणारा हर्षल हिंदूस्तान टाईम्सशी बोलताना म्हणाला, ‘जेव्हा मी आरसीबी संघात सामील झालो, तेव्हा विराटने मला संदेश पाठवला होता की ‘वेलकर बॅक, यावेळी तू खेळशील.’ मला यामुळे खूप आत्मविश्वास मिळाला. त्यावेळी मी विचार केला की हा तोच संघ आहे, ज्याकडून मी माझ्या प्रतिभेचे प्रदर्शन करु शकतो.’
तसचे आरसीबीचा कर्णधार विराटबद्दल पुढे बोलताना तो म्हणाला, ‘तो तुम्हाला तुमचे काम करु देतो. अगदी जर एखाद्यावेळी तुमची योजना काम करत नसेल, तर तो कोणाहीपेक्षा जास्त चांगले समजतो की हा फलंदाजाचा दिवस आहे. जेव्हा आम्ही योजनेची अंमलबजावणी करण्यास अक्षम असतो किंवा आम्ही आमच्या योजनेपासून भटकतो, तेव्हा आम्ही समीक्षा करण्यासाठी बसतो, त्यावेळी आमच्यात एवढेच बोलणे होते की आपण आपल्या मार्गावर राहाण्यासाठी काय करायला हवे, आपण आपल्या योजना अंमलात आणण्यासाठी चांगली मानसिकता कशी ठेवू शकतो.’
हर्षलला दिल्लीकडून केले ट्रेड
हर्षल गेल्या २ हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. दोन वर्षापूर्वी त्याला दिल्लीने २० लाख रुपयात खरेदी केले होते. पण यंदाच्या हंगामासाठी त्यांनी त्याला आरसीबीबरोबर ट्रेड केले. विशेष म्हणजे २०१२ ते २०१७ दरम्यान हर्षल आरसीबी संघाचा भाग होता.
आयपीएल २०२१ हंगाम हर्षलसाठी ठरला लाभदायी
आयपीएल २०२१ हंगामात हर्षल पटेलने ७ सामने खेळताना १७ विकेट्स घेतल्या. या या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट्स घेण्याचीही कमाल केली होती.
बेंगलोरची चमकदार कामगिरी
यंदाच्या हंगामात बेंगलोरने शानदार कामगिरी केली होती. त्यांनी या हंगामातील त्यांचे सुरुवातीचे ४ सामने सगल जिंकत कमाल केली होती. हा हंगाम स्थगित झाला तेव्हा बेंगलोरने ७ सामन्यांपैकी ५ सामन्यांत विजय मिळवले होते, तर २ सामन्यांत पराभव स्विकारला होता. त्यामुळे ते गुणतालिकेत १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या श्रीलंका दौर्याला १३ जुलै रोजी होणार सुरवात, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक
‘तो’ खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकत होता, राहुल द्रविडने व्यक्त केले मत
कोहली-रोहितच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौर्यावर कोण करणार नेतृत्व? ‘हे’ आहेत भारताचे पर्याय