बेंगलोर | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार कर्णधार एमएस धोनीने काल आपल्या संघाला आयपीएलमध्ये एकहाती सामना जिंकून दिला. अगदी शेवटपर्यंत मैदानावर रहात त्याने षटकार खेचून विजय साकारला.
याबरोबर त्याने असा एक विक्रम केला आहे जो जगात आजपर्यंत कुणालाही जमला नाही. त्याने कर्णधार म्हणून टी२०मध्ये ५००० धावांचा टप्पा पार केला आहे.
याच सामन्यात एका खेळाडूने खास विक्रम केला. तो खेळीडू म्हणजे उमेश यादव. आयपीएलचा १०० वा सामना खेळत असलेल्या यादवने १००व्या सामन्यात १०० वी विकेट घेतली.
या सामन्यात ४ षटकांत २३ धावा देत त्याने १ विकेट घेतली. त्याने घेतलेली ही विकेटही खास होती. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सुरेश रैनाला त्याने ६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले.
उमेश यादवने कसोटीत ९९, टी२०मध्ये १, वनडेत १०२ तर आय़पीएलमध्ये १०० विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमधील १०० विकेट त्याने दिल्ली, बेंगलोर आणि कोलकाता या संघाकडून घेतल्या आहेत.
#मराठी आयपीएलमध्ये १०० विकेट्स घेणारे खेळाडू.. pic.twitter.com/Fybb88Kj33
— Sharad Bodage (@SharadBodage) April 27, 2018
आयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा तो केवळ १२वा खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारतीय संघातील या दोन मित्रांचं मराठीतील संभाषण नक्की पहा
–कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी हे आहे नाराज करणारे वृत्त
– सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने
–टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच
–सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली