आज आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेत शेवटचा लीग स्टेज सामना खेळला जाणार आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (RCB vs LSG) दोन्ही संघात सामना होणार आहे. तसेच लखनऊ प्लेऑफच्या शर्यतीतून केव्हाच बाहेर पडले आहे. त्याचबरोबर हे देखील निश्चित झाले आहे की, पंजाब किंग्स (punjab kings) पहिला क्वालिफायर सामना खेळणार आहे, दुसरीकडे मुंबई इंडियन्सला (mumbai indians) एलिमिनेटर सामना खेळायचा आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, पण अजूनही प्लेऑफचे पूर्ण वेळापत्रक समोर आलेलं नाही.
पॉईंट्स टेबल पहायचे झाल्यास, पंजाब संघ 19 गुणांसोबत टॉपच्या स्थानी विराजमान आहे. तसेच 18 गुणांसोबत गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांचे 14 सामने पूर्ण झालेले आहेत. चौथ्या स्थानावर मुंबई आहे ज्यांचे 16 गुण आहेत आणि मुंबई चौथ्या स्थानावर राहणार आहे. पण आजच्या सामन्यात आरसीबीच्या (RCB) विजयानंतर अंतिम सामन्याचे संपूर्ण समीकरण बदलू शकते.
टॉप चार संघांमध्ये आरसीबी एकमात्र संघ आहे, ज्याचा एक सामना राहिलेला आहे. जर आज आरसीबीने लखनऊला मोठ्या अंतराने पराभूत केले तर ते पॉईंट्स टेबलवर पहिल्या स्थानावर पोहोचतील. अशा परिस्थितीत आरसीबीची टक्कर पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्स विरुद्ध (RCB vs PBKS) होईल. जर आरसीबी पंजाबमध्ये पहिला क्वालिफायर सामना झाला तर गुजरात आणि मुंबई इंडियन्सच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
आरसीबी पहिल्या क्वालिफायरमध्ये पोहोचली, तर गुजरात आणि मुंबई (GT vs Mi) यांच्यात एलिमिनेटर सामना होईल. अशा परिस्थितीत गुजरात किंवा मुंबईमधील कोणताही एक संघ पुढे जाईल. एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाशी सामना खेळेल. एलिमिनेटर विजेत्या संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी क्वालिफायर 1 मध्ये हरणाऱ्या संघाला देखील पराभूत करावे लागेल. यासाठी गुजरात आणि मुंबईला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी 2 विजय प्राप्त करावे लागतील.
हे निश्चित आहे की, मुंबई इंडियन्स (mumbai indians) एलिमिनेटर सामना खेळणार आहे. पण गुजरात संघासाठी आरसीबीचा पराभव होणे फायद्याचे आहे. ज्यामुळे आरसीबीआधी ते प्लेऑफमध्ये पोहोचतील.






