आयपीएल 2023 स्पर्धेचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगला. या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजीत आरसीबीची सुरुवात चांगली झाली असली तरी, त्यांना त्याचवेळी एक मोठा धक्का बसला. आपला पहिला सामना खेळत असलेल्या रिस टोप्ली गंभीररित्या दुखापतग्रस्त झाला आहे.
आरसीबीने या वर्षीच्या हंगामाआधीच्या लिलावात इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज रिस टोप्ली याला 4 कोटींची रक्कम देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. जोस हेजलवूडच्या अनुपस्थितीत त्याला पहिल्याच सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने आपले हे पदार्पण सार्थ करत दुसऱ्याच षटकात बळी मिळवला.
Reece Topley off the field due to shoulder discomfort. pic.twitter.com/w9Mzz87WHa
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 2, 2023
मात्र, त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली. मुंबईच्या डावाच्या आठव्या षटकात क्षेत्ररक्षण करत असताना तो उजव्या खांद्यावर पडला. तो पडताक्षणी त्याचा खांदा निखळल्याचे स्पष्ट झाले. तो वेदनेने विहळताना दिसला. सूत्रांच्या माहितीनुसार,
‘टोप्लीचा उजवा खांदा निखळला होता. मात्र, फिजीओने तात्काळ त्याच्यावर उपचार करत तो व्यवस्थित केला. मात्र, असे असले तरी त्याला आरामाची गरज असून तो या सामन्यातून तरी बाहेर झाला आहे. त्याची पुढील चाचणी लवकरच होईल व तो खेळण्यासाठी कधी उपलब्ध असेल याबाबत माहिती दिली जाईल.’
टोप्लीने या सामन्यात केवळ दोन षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 14 धावा देताना कॅमेरून ग्रीनचा महत्वपूर्ण बळी देखील मिळवला. टोप्ली तंदुरुस्त न झाल्यास हा आरसीबी संघासाठी मोठा धक्का असेल. कारण, यापूर्वी प्रमुख वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड हा देखील कधीपर्यंत उपलब्ध होईल, याबाबत माहिती मिळालेली नाही.
(RCBvMI Reece Topley has dislocated his shoulder but put it in place now)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त 1 धाव करूनही हिटमॅन ‘रेकॉर्ड बुक’मध्ये! सचिननंतर रोहित दुसराच
रोहित शर्माचा भीमपराक्रम! IPL 2023च्या पहिल्या सामन्यात 1 धावेवर बाद होऊनही केला ‘हा’ रेकॉर्ड