आयपीएल 2023 स्पर्धेत रविवारी (दि. 23 एप्रिल) पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स संघात सुरू झाला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने पहिल्याच चेंडूवर योग्य ठरवत, आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याला पायचित पकडले.
💯 #TATAIPL | #RCBvRR https://t.co/viMA8wLxBL pic.twitter.com/Yk8EVbw2TX
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2023
नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. आतापर्यंत स्पर्धेतील सर्वात यशस्वी सलामी जोडी असलेल्या विराट कोहली व फाफ डू प्लेसिस यांनी आरसीबीसाठी फलंदाजीची सुरुवात केली. मात्र राजस्थानकडून प्रथम गोलंदाजी करत असलेल्या ट्रेंट बोल्टने पहिल्याच चेंडूवर आपल्या संघाला यश मिळवून दिले.
पहिल्या चेंडूचा सामना करत असलेल्या कर्णधार विराट कोहली याला त्याने पायचित केले. विराटकडे तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याचा पर्याय असताना देखील त्याने, आपण यष्ट्यांसमोर असल्याचे समजून जात थेट तंबूचा रस्ता धरला. विशेष म्हणजे आत्तापर्यंत आयपीएल कारकिर्दीत विराट प्रथमच बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे.
विराट पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शाहबाज अहमद याला बढती देण्यात आली होती. मात्र, तो देखील अपयशी ठरला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बोल्टनेच त्याला झेलबाद केले. मात्र, त्यानंतर प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. संदीप शर्मा व ट्रेंट बोल्ट यांच्यासह रविचंद्रन अश्विनवरही आक्रमण केले. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीमुळे संघाने पावर प्लेमध्ये 2 बाद 62 धावा केल्या.
(RCBvRR Trent Boult Got Out Virat Kohli On Golden Duck)