कोरोना व्हायरसमुळे जगातील सर्वच खेळांच्या स्पर्धा एकतर रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारतासारख्या खंडप्राय देशात क्रिकेट हा खेळाला धर्माप्रमाणे स्थान आहे. अशातच भारतात दोन मोठे स्पोर्ट्स चॅनेल्स आहेत जे या क्रिकेटचे थेट प्रक्षेपण करत असतात.
यात स्टार स्पोर्ट्स व सोनीचा वाटा मोठा आहे. जर सर्व नियोजीत कार्यक्रमाप्रमाणे सुरु असतं तर सध्या स्टार स्पोर्ट्सवर आयपीएलपुर्वी वातावरण निर्मितीसाठीचे मोठे कार्यक्रम सुरु असते. परंतु कोरोनामुळे हे सर्व सध्या ठप्प झाले आहेत. स्टार स्पोर्ट्स टेलिव्हीजन व हाॅटस्टारच्या माध्यमातून खेळांचे थेट प्रक्षेपण करते. टेलिव्हीजन व ऑनलाईन अशा दोन्ही ठिकाणी स्टारची मक्तेदारी आहे.
स्टार स्पोर्टने बीसीसीआयकडून भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क ६११८ कोटी रुपयांना तर आयपीएलचे हक्क १६३४७ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. आयपीएलचे हक्क २०१८ ते २०२२ या पाच वर्षासाठी असून प्रत्येक वर्षाला बीसीसीआयला ३ हजार २६९ कोटी मिळणार आहे. या लिलावातून बोर्डाला अंदाजे २० हजार कोटी रुपये मिळण्याचा अंदाज होता. परंतु अपेक्षेप्रमाणे बोर्डाला पैसे मिळाले नाहीत.
एकप्रकारे स्टारने भारतात होणारा एक आंतरराष्ट्रीय सामना ६०.१ कोटी तर आयपीएलचा एक सामना ५५ कोटी रुपयांना बीसीसीआयकडून विकत घेतला आहे. अगदी चेंडूत बोलायचं झालं तर २३.३ लाख रुपये एका चेंडूसाठी स्टार बीसीसीआयला मोजते.
अशात हे सामने रद्द झाले तर स्टारचे मोठे नुकसान होणार आहे. स्टारचे भारतात तब्बल १६ चॅनेल्स दिसतात. यावर सध्या कधीही पाहिलं तरी जुनेच सामने किंवा हायलाईट्स दाखवल्या जात आहे. माहितीपट, साठवलेल्या जुन्या व्हीडिओ क्लिप्स किंवा जुने सामने सोडून सध्या दाखविण्यासारखं स्टारकडे काही नाही. याचबरोबर स्टारकडे हक्क असलेल्या प्रीमियर लीग, बुंडेस्लिगा व फाॅर्मुला वनही कोरोनामुळे रद्द झाल्या आहेत. विशेष म्हणजे आय़पीएलसाठी स्टारच्या १०० पैकी ९०% जाहीरातींच्या जागा जवळपास पक्क्या झाल्या झाल्या होत्या.
एकदा का लाईव्ह सामना संपला की त्याच्या फुटेजचे महत्त्वही संपते. ही फुटेज प्रेक्षक जास्तीत जास्त ती मालिका चालु असण्याच्या काळापर्यंत पाहतात. नंतर अशी फुटेज अर्काईव्ज किंवा सिरीजच्या कामी येतात. जे महत्त्व लाईव्ह गोष्टींना आहे ते नक्कीच साठवुण ठेवलेल्या किंवा हाईलाईट्सला नाही. त्यामुळे यातून काहीही कमाई होत नाही किंवा झाली तरी ती खूपच कमी असते.
दुसऱ्या बाजूला सोनी नेटवर्क्सचेही भारतात १० चॅनेल्स आहेत. तेही सध्या स्टारप्रमाणेच दिव्यातून जात आहेत. सोनीने भारतातील क्रिकेट सामन्यांसाठी तसेच आयपीएलसाठी बोली लावली होती. परंतु या दोन्ही बोलीत पराभूत झाल्यावर त्यांनी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियातील क्रिकेट सामन्यांचे हक्क मिळवले. सोनीकडे युरो २०२० व टोकियो ऑलिंपिक्स २०२०चेही हक्क आहेत. या स्पर्धा पुढील ४ महिन्यात सुरु होणार आहे. परंतु यांचेही भविष्य आधांतरी आहे.
सध्या सोनी भारतीय महिला क्रिकेटवर तयार केलेली पाच भागांची मालिका दाखवत आहे. परंतु व्हिजुअल्स लाईव्ह नसल्यामुळे प्रेक्षक किती मिळतील हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अशा काळात स्टार काय किंवा सोनी काय? यांना प्रेक्षकापर्यंत पोहचण्यासाठी पहिल्यापेक्षा खूपच जास्त कष्ट करावे लागणार आहे.
महत्त्वाचे लेख-
–संपूर्ण यादी: भारतीय क्रिकेट बोर्डाला विविध माध्यमातून मिळणारे पैसे ऐकून आपण आश्चर्यचकित व्हाल !
ट्रेंडिंग घडामोडी-
–बरोबर १३ वर्षांपुर्वी १२७किलो वजनाच्या क्रिकेटपटूने घेतला होता उथप्पाचा नेत्रदिपक झेल, पहा व्हीडिओ
–टीम इंडियाचा शिलेदार कोरोना व्हायरस संपल्यावर पहिलं हे काम करणार
-इंग्लंडने उचलले मोठे पाऊल, क्रिकेटसाठी नक्कीच निराशाजनक गोष्ट