रविवारी (३१ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने होते. उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने अप्रतिम कामगिरी करत ८ गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात गोलंदाजी करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना आक्रमण करण्याची जास्त संधी दिली नाही. परंतु रोहित शर्माला संधी मिळताच, त्याने संधीचा फायदा घेतला आणि एक गगनचुंबी षटकार मारला. जे पाहून चाहत्यांनी दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात काही मोठे बदल करण्यात आले होते. सूर्यकुमार यादवला बाहेर करून, ईशान किशनला तर भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली होती. तसेच ईशान किशनला डावाची सुरुवात करण्याची देखील संधी देण्यात आली होती.परंतु तो मोठी खेळी करू शकला नाही.
तसेच नेहमी डावाची सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते. रोहित शर्माकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु त्याला अवघ्या १४ धावा करता आल्या. या छोट्या खेळीदरम्यान त्याने एक आकर्षक शॉट मारला जे पाहून चाहते भलतेच खुश झाले होते.
तर झाले असे की, पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माने फ्लिक शॉट मारला, जो बॅटला लागताच सीमारेषेच्या बाहेर गेला. हा शॉट पाहून एक महिला चाहती भलतीच खुश झाली होती. एकीकडे फलंदाज बाद होत असताना रोहित शर्माच्या या शॉटने चाहत्यांना धीर दिला होता.
https://www.instagram.com/reel/CVskOejl0SJ/?utm_medium=copy_link
न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून मिळवला विजय
या सामन्यात न्यूझीलंड संघांने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक २६ तर हार्दिक पंड्याने २३ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद ११० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून मिचेलने सर्वाधिक ४९ आणि केन विलियमसनने ३३ धावांची खेळी करत न्यूझीलंड संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा विश्वचषकात बॅटिंग ऑर्डरवरुन गोंधळला कर्णधार विराट, २०१९ मध्येही अशीच डुबवलेली भारताची नाव
टेक इट इझी! ‘या’ समीकरणांनी ‘टीम इंडिया’ अजूनही पोहचू शकते उपांत्य फेरीत