येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान इंग्लंडच्या च्या साउथॅम्प्टनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळायची आहे. त्यामुळे बीसीसीआयने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी २० सदस्यीय संघाची घोषणा केली होती. या संघात भुवनेश्वर कुमारला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्याला संघात स्थान न देण्याचे कारण समोर आले आहे.
या संघात बीसीसीआयने सहा वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. तसेच आणखी तीन राखीव गोलंदाज देखील आहे.
आईएएनएसच्या अहवालानुसार, भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली नाही कारण त्याने २०१८ पासून एकही प्रथम श्रेणीचा सामना खेळला नाहीये. त्याने शेवटचा सामना जानेवारी २०१८ मध्ये खेळला होता. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, निवडकर्त्यांना असे जाणवले की, भुवनेश्वर कुमार मोठी मालिका खेळण्यासाठी फिट नाहीये, मुख्यतः या दौऱ्यासाठी. या अहवालात असेही म्हटले गेले की, गेल्या काही महिन्यांत भारतीय संघाला अनेक युवा गोलंदाज मिळाले आहेत, ज्यांनी उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमारची कमतरता जाणवली नाही
गेले काही महिने, दुखापतीमुळे भुवनेश्वरचे भारतीय कसोटी संघात येणे जाणे सुरू होते. त्याने दुखापतीतून बाहेर आल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी आणि सैयद मुश्ताक अली स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत संधी देण्यात आली होती. त्याने ३ वनडे सामन्यात ६ गडी बाद केले होते. त्यानंतर झालेल्या टी-२० मालिकेत त्याने ४ गडी बाद केले होते. तसेच एका सामन्यात त्याने अवघ्या १५ धावा देत २ गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: रिषभ काहीही करू शकतो! घरी असलेला पंत फिट राहण्यासाठी चक्क काढतोय लॉनमधील गवत
डन! कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात ‘हा’ खेळाडू करणार क्रिकेटला अलविदा
रोहित-कोहली नव्हे तर ‘हे’ ३ खेळाडू ठरू शकतात कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये सामनावीर पुरस्काराचे मानकरी