---Advertisement---

कसोटी चॅम्पियनशीप: विराट वगळता भारताचे इतर फलंदाज इंग्लंडमध्ये ठरलेत फेल! रोहितच्या नावे फक्त ३४ धावा

On: बुधवार, मे 12, 2021 12:58 PM
Virat-Kohli-Rohit-Sharma, Test
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा चौदावा हंगाम संपल्यानंतर भारतीय क्रिकेट रसिकांना विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचे वेध लागले आहे. जून महिन्यात १४-२२ तारखेदरम्यान इंग्लंडच्या साउथम्पटन स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे तुल्यबळ संघ या चुरशीच्या लढतीत आमनेसामने असतील. परंतु इंग्लंडच्या भूमीत हा महत्त्वपुर्ण सामना होणार असल्याने भारतीय फलंदाजांची चिंता वाढली आहे.

कारण कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या २० सदस्यीय भारतीय संघातील विराट कोहली वगळता इतर फलंदाजांना इंग्लंडमध्ये विशेष कामगिरी आला नाही. भारताचा धाकड सलामीवीर रोहित शर्माला तर इंग्लंडमध्ये फक्त एका कसोटी सामन्याचा अनुभव आहे. याउलट न्यूझीलंडच्या फलंदाजांचे इंग्लंडमधील प्रदर्शन भारताच्या तुलनेत चांगले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ संघर्ष करताना दिसू शकतो.

कोहलीव्यतिरिक्त सर्वांची सरासरी ३० पेक्षा कमी
कोहलीने आतापर्यंत इंग्लंडमध्ये १० कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ३६.३५ च्या सरासरीने ७२७ धावा चोपल्या आहेत. यात २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाची इंग्लंडच्या भूमीतील फलंदाजी सरासरी ३० पेक्षा जास्त नाही.

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याची फलंदाजी सरासरी २९.२६ इतकी आहे. त्याने या सरासरीने १० कसोटी सामन्यात ५५६ धावा केल्या आहेत. तर कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारानेही २९.४१ च्या सरासरीने ९ सामन्यात ५०० धावा केल्या आहेत. तसेच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचीही फलंदाजी सरासरी ३० पेक्षा कमी (२७.००) राहिली आहे. रोहित शर्माने तर इंग्लंडमध्ये आतापर्यंत फक्त १ कसोटी सामना खेळला आहेत. २०१४ साली झालेल्या या सामन्यात तो फक्त ३४ धावा करु शकला होता.

अष्टपैलूंमध्ये जडेजाची कामगिरी दिलासादायक
भारतीय कसोटी संघाता जागा मिळालेला अष्टपैलू रविंद्र जडेजा याची इंग्लंडमधील दमदार राहिली आहे. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्याने अवघे ५ कसोटी सामने खेळताना ३०.६६ च्या सरासरीने २७६ धावा केल्या आहेत. तसेच अष्टपैलू आर अश्विन याच्याही नावे २३२ धावांची नोंद आहे. त्याने ६ कसोटी सामन्यात ही धावसंख्या उभारली आहे.

रॉस टेलरची फलंदाजी सरासरी प्रशंसनीय
हेच जर, भारताचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघाविषयी बोलायचे झाले तर, त्यांचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरची इंग्लंडमधील कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्याने इंग्लंडमध्ये ७ कसोटी सामने खेळताना ४० च्या सरासरीने ५२३ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच कर्णधार केन विलियम्सन यानेही ८ डावात ३१ च्या सरासरीने २४७ चोपल्या आहेत. तसेच सलामीवीर टॉय लॅथम यानेही अवघ्या ४ डावात १४६ धावा जमवल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

फॉर्म नव्हे तर ‘ही’ गोष्ट नडली, भूवीची इंग्लंड दौऱ्यावर निवड न होण्यामागचे कारण आले पुढे

Video: रिषभ काहीही करू शकतो! घरी असलेला पंत फिट राहण्यासाठी चक्क काढतोय लॉनमधील गवत

डन! कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात ‘हा’ खेळाडू करणार क्रिकेटला अलविदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---