---Advertisement---

‘या’ कारणांमुळे हुकली रसेल-नरीनची वर्ल्डकप वारी; निवडकर्ते म्हणतायेत, “आता ते…”

---Advertisement---

दोन वेळा टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक निकोलस पूरन करेल. तर, उपकर्णधारपदी अष्टपैलू रोवमन पॉवेलची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे या संघात सध्या जगातील सर्वात विध्वंसक अष्टपैलू असलेल्या आंद्रे रसेलला व अनुभवी फिरकीपटू सुनील नरीन यांना स्थान मिळाले नाही.

जगभरातील फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या आंद्रे रसेल व सुनील नरीन यांना संघात जागा न मिळाल्याने चाहते आश्चर्यचकित झाले. याबाबत स्पष्टीकरण देताना निवडसमितीचे प्रमुख डेस्मंड हेन्स यांनी म्हटले,
“रसेल यावर्षी अजिबात फॉर्ममध्ये नाही. काही दिवसांपूर्वीच त्याच्याशी माझी भेट झाली. तो फॉर्मत नसल्याने त्याच्या जागी दुसऱ्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूला संधी देण्याचा आम्ही विचार केला. अखेर सर्वांनाच एक दिवस पुढचा विचार करावा लागतो. दुसरीकडे नरीन स्वतः देशासाठी खेळण्यासाठी इच्छुक दिसत नाही. पूरनचे त्याच्याशी बोलणे झाले होते. मात्र तो पुन्हा खेळण्यासाठी सकारात्मक वाटला नाही.”
नरीनने 2012 तर रसेलने 2016 मध्ये वेस्ट इंडिजला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. नरीन 2014 नंतर वेस्ट इंडिजसाठी कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नाही. तर, रसेलला मागील वर्षी दुखापतीमुळे टी20  विश्वचषकातून बाहेर व्हावे लागले होते.

टी20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज संघ-
निकोलस पूरन (कर्णधार), रोवमन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, शिमरन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मेकॉय, रेमन रिफर व ओडियन स्मिथ.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, आशिया चषकातील 5 खेळाडूंची हाकालपट्टी
राजस्थान रॉयल्सच्या फ्रॅंचायजीचा हेड कोच झाला जेपी डुमिनी, कोचिंग स्टाफची यादीही झाली जाहीर
एलिसा पेरीने तोडला विश्वविक्रम, ‘इतके’ किमी पळत येत डेविड वॉर्नरला केली बॉलिंग

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---